ETV Bharat / sitara

प्रीतीचं पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी उलटं, 'कबीर सिंग'च्या प्रीतीची इमोशनल पोस्ट - preeti

एका वर्षापूर्वी मी प्रीतीच्या पात्रात प्रवेश केला होता. लाजरी आणि शांत हे प्रीतीचं पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी उलट होतं. पण मी तिची शक्ती, दृढनिश्चय, तिचं प्रेम आणि तिचा छंद या सर्व गोष्टी पाहिल्या, असं कियारानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'कबीर सिंग'च्या प्रितीची इमोशनल पोस्ट
author img

By

Published : Jul 21, 2019, 2:11 PM IST

मुंबई - अर्जुन रेड्डी या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला 'कबीर सिंग' काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला. आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक महिना पूर्ण झाला असून चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकलेल्या कियारा अडवाणीने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

प्रत्येक वेळी मी कबीर सिंग चित्रपटाबद्दल माझी भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करते, मात्र सुरू कुठून करावं हेच मला समजत नाही. मात्र, यावेळी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, आज चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद आणि चित्रपटाची अशी टीम मला मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. एका वर्षापूर्वी मी प्रीतीच्या पात्रात प्रवेश केला होता. लाजरी आणि शांत हे प्रीतीचं पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी उलट होतं. पण मी तिची शक्ती, दृढनिश्चय, तिचं प्रेम आणि तिचा छंद या सर्व गोष्टी पाहिल्या, असं कियारानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

यासोबतच तिनं शाहिदचंही कौतुक केलं आहे. माझा सहकलाकार, आत्मविश्वास आणि या प्रवासातील मित्र ज्याने हा प्रवास पूर्ण आणि अविश्वसनीय बनवला. तुझा वेडेपणा मिस करत आहे. या खास चित्रपटात तुझ्यासोबत काम करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजते, असं तिनं म्हटलं आहे. यासोबतच चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी यांच्याबद्दलही तिने लिहिलं आहे. त्यांची कथा सत्यात उतरवण्याचा दृढनिश्चय, चित्रपटांविषयीची आवड आणि कामाप्रतीचा प्रामाणिकपणा यामुळेच आम्हाला ही पात्र साकारण्याची संधी मिळाली. याशिवाय प्रेक्षकांनी या चित्रपटाला इतकं प्रेम दिलं यासाठी त्यांचेही आभार, असं प्रीतीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.