मुंबई - डब्बू रत्नानी यांच्या कॅलेंडरसाठी कियारा अडवाणी हिच्या हॅट्रीक फोटोंचे फोटोग्राफरने अनावरण केले. समुद्रकिनार्याच्या पार्श्वभूमीवर विलक्षण सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न या फोटोतून पाहायला मिळतो.
वाळूच्या दरम्यान उभे असलेली, कियारा अडवानी ही डब्बू रत्नानीच्या तिच्या तिसऱ्या कॅलेंडर फोटोत मोहक दिसत आहे. गेल्या वर्षी डब्बूच्या कॅलेंडरसाठी अभिनेत्री कियाराच्या फोटोशूटने गोंधळ उडाला होता. फॅशन फोटोग्राफरने प्रक्षेपण होण्यापूर्वी एका इन्स्टाग्रामवर हे फोटो प्रसिध्द केले होते. यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये फोटोबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
यंदाचे कॅलेंडरवरील फोटो हे तिनही वर्षातील सर्वात सुंदर असल्याचे कियाराने म्हटले आहे. कियारा अडवानीने २०१९ मध्ये डेब्यू रत्नानीच्या कॅलेंडरवर सुशोभित निळ्या जीन जॅकेटसह पदार्पण केले होते.
गेल्या वर्षी डब्बूच्या कॅलेंडरवर कियारा अडवानीचे फोटो झळकल्यामुळे इंटरनेटवर वादळ निर्माण झाले होते. कियाराने सलग तिसऱयांदा कॅलेंडरसाठी शूट केले आहे.
अलीकडेच बॉलिवूडमध्ये सात वर्षे पूर्ण केल्यानंतर कियारा अडवाणी तिच्या आगामी 'शेरशाह' चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा करीत आहे. यासोबतच ती 'भुलभुलैय्या २', 'जुग जुग जियो' आणि शशांक खेतानच्या चित्रपटात झळकणार आहे.
हेही वाचा - अर्जुन रामपालचा 'धाकड' लूक, चमकते प्लॅटिनम केस पाहून चाहते अवाक