ETV Bharat / sitara

कॅटरिना म्हणते, 'भारत'मधील रोल दुसऱ्यासाठी लिहिला गेल्याने तो साकारणं कठीण - role

हे पात्र दुसऱ्या अभिनेत्रीसाठी लिहिलं गेलं होतं. त्यामुळे, ही भूमिका साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं, असं तिनं म्हटलं आहे.

भारतमधील आपल्या रोलबद्दल बोलली कॅटरिना
author img

By

Published : May 29, 2019, 9:55 AM IST

मुंबई - अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफ 'भारत' चित्रपटातून पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. दरम्यान चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना हा रोल साकारणे आपल्यासाठी कठीण होते, असे कॅटरिनाने म्हटले आहे.

चित्रपटात कॅटरिना कुमूद नावाचं पात्र साकारत आहे. हे पात्र दुसऱ्या अभिनेत्रीसाठी लिहिलं गेलं होतं. त्यामुळे, ही भूमिका साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं, असं तिनं म्हटलं आहे. अली अब्बास जफर यांनी मला सांगितलं, की प्रियांका आता या चित्रपटातून काढता पाय घेत आहे. त्यांनी मला या चित्रपटाच्या तयारीसाठी दोन महिने दिले होते, असे कॅटरिना यावेळी म्हणाली.

या चित्रपटासाठी मला माझ्या भाषेवर विशेष मेहनत घ्यावी लागली असल्याचे तिने म्हटले आहे. अली अब्बास जफरबद्दल बोलताना कॅटरिना म्हणाली, की तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि कामाबद्दल तो खूप एकनिष्ठ आहे. दरम्यान प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच ५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

ENT 09

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.