मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या मालदीवमध्ये आहे. यापूर्वी हॉलिडे पॅराडाइजमधील तिचे आनंदी फोटो शेअर करणार्या या अभिनेत्रीने आता तिच्या चाहत्यांना तिच्या सुट्टीतील काही व्हिडिओ शेअर करुन ट्रिट दिली आहे.
मंगळवारी कॅटरिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर व्हिडिओंची एक स्ट्रिंग शेअर केली. बीचवर पक्ष्यांना खायला घालतानाच्या या व्हिडिओत कॅटरिनाने चमकदार गुलाबी टी-शर्ट आणि काळा डेनिम घातलेला दिसत आहे.
सोमवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर कॅटरिनाने समुद्रकिनाऱ्यावरील फोटो शेअर केले होते. फोटोंमध्ये तिने फुलांच्या शॉर्ट्ससह पांढरा-हिरवा शर्ट परिधान केलेला दिसत होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तिच्या ताज्या इंस्टाग्राम स्टोरीनुसार कॅटरिनाची मालदीवची भेट एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी आहे. अभिनेत्री एका शीतपेय ब्रँडसाठी शूटिंग करत आहे.
कामाच्या आघाडीवर, कॅरिनाच्या भविष्यातील चित्रपटांमध्ये 'टायगर 3', 'मेरी ख्रिसमस' तसेच प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट सह-कलाकार फरहान अख्तरचा 'जी ले जरा' या चित्रपटाचा समावेश आहे.
हेही वाचा - 'बधाई दो'चा ट्रेलर : सामाजिक विषयावर भाष्य करणारे धमाल विनोदी कौटुंबीक मनोरंजन