मुंबई - अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केल्यापासून कॅटरिना कैफ चर्चेत आहे. अलीकडेच सलमान खानसोबत 'टायगर 3' या तिच्या आगामी चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसलेल्या या अभिनेत्रीने शुक्रवारी श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस'च्या शूटिंगला सुरुवात केली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इंस्टाग्राम हँडलवर घेऊन कॅटरिनाने चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये विजय सेतुपती देखील दिसत आहे. फोटोत चित्रपटाचा क्लॅपबोर्ड दिसत असून त्याच्या बाजूला विनाइल रेकॉर्ड प्लेअर दिसत आहे. अभिनेत्री नेहा धुपियाने फोटोवर प्रतिक्रिया दिली आणि कमेंट केली आहे. नेहाने लिहिलंय, "शुभेच्छा, के!" आणि त्याच्या बाजूला एक हार्ट इमोजी जोडला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कॅटरिनाने ख्रिसमसच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबर २०२१ रोजी तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाची घोषणा केली होती. तिने कॅप्शन लिहिले होते, "नवीन सुरुवात. मेरी ख्रिसमससाठी दिग्दर्शक श्रीराम राघवनसोबत सेटवर परतले! मला नेहमीच श्रीराम सरांसोबत काम करायचे आहे, जेव्हा थ्रिलर्स दाखवणाऱ्या कथांचा विचार केला जातो तेव्हा यातील ते एक मास्टर आहेत आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणे ही सन्मानाची गोष्ट आहे.''
मक्कल सेल्वन विजय सेतुपती आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्रीराम राघवन यांच्यासोबत कॅटरिनाचा हा पहिला चित्रपट आहे.
हेही वाचा - प्रीमियर लीग फुटबॉलसाठी रणवीर सिंग यूकेला रवाना