ETV Bharat / sitara

साराच्या घरी स्पॉट होताच कार्तिकनं लपवला चेहरा, नेमकं काय आहे कारण

गेल्या काही दिवसांत अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट केले गेले आहे. मात्र, यावेळी कॅमेरा समोर पाहताच कार्तिकने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे

साराच्या घरी स्पॉट होताच कार्तिकनं लपवला चेहरा
author img

By

Published : May 3, 2019, 11:04 AM IST

मुंबई - अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन लवकरच लव आज कलच्या सिक्वलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. तर चित्रीकरणादरम्यान सारा आणि कार्तिकमधील जवळीकता वाढताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांत अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट केले गेले आहे. मात्र, यावेळी कॅमेरा समोर पाहताच कार्तिकने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. नुकताच कार्तिक कामानिमित्त साराच्या घरी गेला होता. यावेळी घराबाहेर निघताच मीडियाच्या कॅमेऱ्यांनी कार्तिकला घेरलं. मात्र, कार्तिकने कॅमेरे समोर पाहताच आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला, जो अपयशी ठरला.

आता कार्तिकने चेहरा लपवण्यामागचं नेमकं कारण तर कळू शकलं नाही. सारा आणि कार्तिकची जोडी खऱ्या अर्थाने तेव्हापासून चर्चेत आली, जेव्हा साराने कॉफी विथ करणच्या चॅट शोमध्ये कार्तिकला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली. आता साराची ही इच्छा खरंच पूर्ण झाली आहे, की दोघेही केवळ आपल्या आगामी चित्रपटामुळे एकत्र वेळ घालवत आहेत, हे अद्याप समोर आलं नाही.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.