ETV Bharat / sitara

कार्तिक आर्यनच्या फिमेल फॅन्सनी गुलाब देण्यासाठी केला पाठलाग, व्हिडिओ व्हायरल - फिमेल फॅन्सनी केला कार्तिक आर्यनचा पाठलाग

अभिनेता कार्तिक आर्यनला फिमेल फॅन्सने मुंबई विमानतळावर गाठले व त्याला गुलाब ऑफर केले. यावेळी उपस्थित मीडिया फोटोग्राफर्सची हे दृष्ट टिपण्यासाठी धांदल उडाली होती.

अभिनेता कार्तिक आर्यन
अभिनेता कार्तिक आर्यन
author img

By

Published : Mar 22, 2022, 4:46 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा हार्टथ्रोब कार्तिक आर्यन त्याच्या क्रेझी महिला फॅन फॉलोइंगसाठी ओळखला जातो. तो जिथेही जातो तिथे त्याला महिला फॅन्स घेरतात. मुंबई विमानतळावर त्याला असेच घेरल्याचे चित्र पाहायला मिळाले. तो एका विचित्र परिस्थितीत अडकला होता. कार्तिकच्या दोन महिला चाहत्यांनी त्याला पकडण्यासाठी आणि प्रसारमाध्यमांसमोर गुलाब देण्यासाठी धाव घेतली. हे दृष्य कॅमेऱ्यात मिळवण्यासाठी हौशी फोटोग्राफर्सची धांदल उडाली होती.

कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहे ज्यामध्ये तो गुलाबी रंगाचा हुडी आणि खाकी पँट घातलेला दिसत आहे. हुडी आणि मास्क घालून कार्तिकने गुपचुप जाण्याचा प्रयत्न केला परंतु मीडियाच्या उपस्थितीमुळे इतरांना विमानतळावर त्याच्या उपस्थितीची जाणीव झाली. कार्तिक बॉडीगार्ड घेऊन चालत असताना दोन मुली हातात गुलाब घेऊन त्याच्याकडे धावत आल्या.

सुरुवातीला कार्तिकला त्याच्या चाहत्यांशी कसे वागायचे हे कळले नाही पण नंतर त्याने गुलाब स्वीकारले. कार्तिकने त्याच्या फिमेल फॅन्ससोबत थोडक्यात गप्पा मारल्या आणि एका मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कारण तिचा वाढदिवस होता. चेकाळलेल्या फोटोग्राफर्सनी मुलींना गुडघे टेकून कार्तिकला प्रपोज करण्यास प्रवृत्त केले पण त्यांनी या आगावू सल्ल्याचे पालन करण्याचे टाळले.

कार्तिकला त्याच्या फिमेल फॅन्सकडून मिळणारी अशी वागणूक नवीन नाही. पूर्वी एकदा मुलींचा एक गट त्याच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचला होता आणि त्याच्या इमारतीबाहेर तासनतास उभं राहून त्याच्या नावाचा आरडाओरडा केला होता. जेव्हा ही गोष्ट कार्तिकला कळली तेव्हा तो त्या मुलींना भेटण्यासाठी आला व त्यांच्यासोबत फोटोही काढले होते.

हेही वाचा - पाहा, मौनी रॉयचे लग्नानंतरचे श्रीलंकेतील हॉट फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.