मुंबई - बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झाले नाही. अशात कार्तिकने या चित्रपटाचं उदयपूरमधील दुसरं शेड्यूल पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे.
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून इम्तियाज अलीसोबतचा एक फोटो शेअर करत उदयपूरमधील चित्रीकरण पूर्ण, असं कॅप्शन कार्तिकनं दिलं आहे. या चित्रपटात कार्तिकच्या अपोझिट सारा अली खान झळकणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत.
तर कार्तिक आणि साराशिवाय चित्रपटात रणदीप हुड्डादेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट २०२० मध्ये १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 'लव आज कल' चित्रपटाचा सिक्वल असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली गेली नाही.