ETV Bharat / sitara

कार्तिकने राजस्थानच्या थंडीवर अशी केली मात, व्हिडिओ व्हायरल - Kartik Aaryan latest news

कार्तिक आर्यन सध्या भुलभुलैया-२ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी राजस्थानमध्ये आहे. त्याने ापल्या सोशल मीडियावर एकव्हिडिओ शेअर केला आहे. यात तो थंडीपासून वाचण्यासाठी फुटबॉल खेळताना दिसत आहे.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन
author img

By

Published : Feb 25, 2020, 7:13 PM IST

जयपूर - अभिनेता कार्तिक आर्यन सध्या 'भुलभुलैय्या-२' चित्रपटाच्या शूटिंगसाठी जयपूर शहरात आहे. शहरात थंडी प्रचंड असून यातून वाचण्यासाठी तो चाहत्यांसोबत फुटबॉल खेळताना दिसत असून, त्याचा त्याने व्हिडिओ केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कार्तिकने लिहिलंय, ''फुटबॉल सेशनच्या मदतीने राजस्थानच्या थंडीवर मात करताना.''

अनिस बझ्मी दिग्दर्शन करीत असलेल्या 'भुलभुलैय्या - २' चित्रपटात कियारा अडवाणी त्याची सहकलाकार आहे.

प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित भुलभुलैय्या हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता. १९९३ मध्ये आलेल्या 'मनिचित्राथाजु' या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेकहोता.

'भुलभुलैय्या-२' ची निर्मिती भूषण कुमार, मुराद खेतानी आणि कृष्ण कुमार करीत असून ३१ जुलै २०२०ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.