ETV Bharat / sitara

कार्तिक आर्यनचा अजून एक ‘धमाका’, रोमँटिक थ्रिलर 'फ्रेडी' साठी वाढवले १४ किलो वजन!

अभिनेता कार्तिक आर्यन याने फ्रेडी सिनेमासाठी 12 ते 14 किलो वजन वाढवले. व्यक्तीरेखा साकारण्यासाठी त्याने केलेली ही मेहनत कौतुकास्पद आहे. जीम ट्रेनर समीर जौराच्या मार्गदर्शनाखाली त्यानी हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले.

कार्तिक आर्यन
कार्तिक आर्यन
author img

By

Published : Oct 12, 2021, 3:04 PM IST

मुंबई - अलीकडच्या काळात बॉलिवूडमधील चित्रपटांतील संहितेचे महत्व वाढलेले आहे. त्यामुळेच ‘हिरोगिरी’ पेक्षा व्यक्तिरेखा सदृश व्यक्तिमत्व दर्शविण्याकडे बॉलिवूड हिरोंचा कल आहे. त्यामुळेच चित्रपटात कलाकारांनी भूमिकेसाठी शरीर कमावले किंवा वजन घटवले अशा बातम्या ऐकायला मिळत असतात. काही मोजकेच अभिनेते असे आहेत ज्यांनी भूमिकेच्या आवश्यकतेनुसार वजन वाढवण्यासाठी देखील स्वतःवर वेगळ्या दृष्टिकोनातून काम केले आहे. मागे आमिर खानने असे केले होते, तसेच सलमान खान ने देखील आणि आता अभिनेता कार्तिक आर्यनने असेच काहीसे केले आहे.

फ्रेडी सिनेमासाठी कार्तिकने वाढवले वजन

जवळपास १० दिवसांच्या रेकॉर्ड वेळेत आपला चित्रपट 'धमाका' पूर्ण केल्यानंतर, या लोकप्रिय अभिनेत्याने 'फ्रेडी'साठी देखील अतिशय वेगळा पवित्रा घेतला. कार्तिकने असेच काहीसे जबरदस्त केले आणि जवळपास १२ ते १४ किलो वजन वाढवले. 'फ्रेडी' हा एक रोमँटिक थ्रिलर असून अनेक अनपेक्षित ट्विस्ट आणि टर्न्सने पुरेपूर असा चित्रपट आहे. एकता कपूरच्या ‘फ्रेडी’ च्या व्यक्तिरेखेची ती गरज होती तसेच त्याच्या भूमिकेसाठी ते आवश्यक होते.

कार्तिक आर्यन
फ्रेडी सिनेमासाठी कार्तिकने वाढवले वजन

अनेकदा अभिनेत्यांसाठी उत्तम शरीरयष्टी राखणे आवश्यक असते, मात्र जेव्हा कार्तिकला त्याच्या फ्रेडीमधील व्यक्तीरेखेसाठी वजन वाढवण्याची गरज सांगण्यात आले तेव्हा, त्याने यासाठी लगेचच तयारी दर्शवली. कार्तिकने आपल्या व्यक्तिरेखेच्या आवश्यकतेनुसार आपला ट्रेनर समीर जौरासोबत आपल्या शरीरावर काम करणे सुरू केले. समीरला बॉडी ट्रांसफॉर्मेशनमधील तज्ज्ञ मानण्यात येते आणि त्याने आपल्या ट्रांसफॉर्मेशन जर्नीमध्ये बॉलीवुडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.

जीम ट्रेनर समीर जौराने केली मदत

कार्तिक आर्यनसोबतच्या या कामाविषयी समीर म्हणाला, “बॉडी ट्रांसफॉर्मेशन म्हणजे केवळ बारीक होणे किंवा शरीर कमावणे, इतपतच सीमित नसून कधी-कधी यात शरीरातील फॅट्स वाढवण्याचा देखील समावेश असतो, ज्याला खूपच सुपरवाइज़्ड आणि सुरक्षित पद्धतीने करावे लागते. कार्तिकचे डेडिकेशन अविश्वसनीय आहे कारण तो बव्हंशी बारीक चणीचा आहे. तो जेनेटिकली लीन असल्याने आपल्या भूमिकेसाठी एका ठरलेल्या कालावधीत एवढे वजन वाढवणे, खरोखरच कौतुकस्पद आहे. कार्तिक शिस्तप्रिय असून, त्याच्यासाठी बनवण्यात आलेला वर्कआउट प्लान आणि योग्य डाएटसोबत हा लूक प्राप्त करण्यासाठी १४ किलो वजन वाढवण्यासाठी सक्षम होता. महत्वाचे म्हणजे फ्रेडीसाठी वाढवलेले वजन त्याने आपल्या आगामी चित्रपटासाठी कमी करणे देखील सुरू केले आहे."

कार्तिक आर्यन राम माधवानी यांच्या ॲक्शन-थ्रिलर 'धमाका’, शशांक घोषचा रोमांटिक थ्रिलर ‘फ्रेडी’ आणि हॉरर-कॉमेडी ‘भूल भुलैय्या’ सोबत अजूनही काही बहुप्रतीक्षित चित्रपटांचा भाग आहे.
हेही वाचा - विकी कौशलवर नाराज आहे म्हणे शाहरुख खान?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.