मुंबई - अभिनेता कार्तिक आयर्नने बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो आपल्या घरात टेबल टेनिस खेळताना दिसत आहे. खरंतर या व्हिडिओत जो सामना सुरू आहे त्यात कार्तिक आपल्या बहिणीकडून हारला आहे.
- View this post on Instagram
Kittu ki khushi mere liye anmol hai.... Isliye maine usse ‘Jeetne Diya’ 👼🏻 #Sacrifice
">
कार्तिकने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याने लिहिलंय, ''किट्टूचा आनंद माझ्यासाठी अनमोल आहे...म्हणून मी तिला जिंकू दिले.''
या व्हिडिओला प्रतिक्रिया देताना टाइगर श्रॉफने म्हटलंय, ''पागल.'' तर एका चाहत्याने लिहिलंय, "भावा बहिणींचा गोल."
चित्रपटांचा विचार करता कार्तिक आर्यन आगामी 'दोस्ताना 2' आणि 'भूल भुलैया 2' या चित्रपटात दिसणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर पोस्ट लिहून आणि 'कोकी पूछेगा' या चॅट शोच्या माध्यमातून त्याने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. शोमध्ये तो कोविड १९ योध्यांशी बातचीत करीत होता.