मुंबई - बॉलिवूडमधील इब्राहिम अली खानच्या पलक तिवारीसोबतच्या ब्रेकिंग न्यूजनंतर सैफच्या घरची आणखी एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरंतर व्हायरल होत असलेला हा जुना व्हिडिओ बॉलिवूडची 'झक्कास' अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाच्या पार्टीचा आहे. या पार्टीत करीना कपूर खानने पती सैफ अली खानसोबत हातात ड्रिंक घेऊन बिनधास्त डान्स केला होता.
हा थ्रोबॅक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सैफ अली खान, करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर देखील दिसत आहेत. व्हिडिओमध्ये करिनाने लेहेंगा घातला आहे आणि सैफ काळ्या शेरवानीमध्ये दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या व्हिडिओमध्ये करीना कपूर हातात ड्रिंक घेऊन नाचताना दिसत आहे. या पार्टीत बॉलिवूडच्या बड्या स्टार्सनीही हजेरी लावली होती. यात सलमान खान आणि शाहरुख खान यासारख्या दिग्गज स्टार्सच्या नावाचा समावेश होता.
सोनम कपूरने 2018 साली बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले होते. मुलीच्या लग्नात अनिल कपूरने फिल्मी दुनियेला ग्रँड पार्टी दिली होती.
गेल्या शुक्रवारी करीना कपूर खानचा सावत्र मुलगा इब्राहिम अली खान टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री पलक तिवारीसोबत स्पॉट झाला होता. या दोघांमध्ये काय शिजतंय, अशी चर्चा चित्रपट जगत आणि सिनेप्रेमींमध्ये सुरू आहे.
हेही वाचा - Relief To Jacqueline Nora Fatehi : जॅकलिन आणि नोरा फतेही यांना दिलासा, मोक्का अंतर्गत होणार नाही कारवाई