हैदराबाद: बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानने इंस्टाग्रामवर एक सेल्फी पोस्ट केला आहे. यात दिसते की ती एका आघाडीच्या क्रीडा फ्रेंचायझीसाठी शूट करत होते. यात तिने आपले बेबी बंप दाखवले असून सामान्य महिलांसारखे तीदेखील गरोदरपणामध्ये आपल्या कामात बिझी असून ती आपल्या वाढणाऱ्या बाळाची काळजीही घेत आहे.
इन्स्टाग्रामवर तिने सेटवरील फोटो शेअर केला असून तिने लिहिलंय की, "आम्ही पुमा इंडियाच्या सेटवर आहोत." फोटोत ती गुलाबी रंगाच्या स्पोर्ट्सवेअरमध्ये प्रेग्नन्सी ग्लो दाखवताना दिसत आहे.
![Kareena Kapoor flaunts baby bump](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9875122_kareena.jpg)
या फोटोला तिच्या चाहत्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला असून केवळ तासाभरात साडेपाच लाख लोकांनी फोटोला लाईक केले आहे.
करिना देणार दुसऱ्या बाळाला जन्म
अभिनेत्री करिना पती सैफ अली खानसोबत दुसर्या बाळाची अपेक्षा करत आहे आणि ती बर्याचदा आपल्या बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. या जोडप्याने १२ ऑगस्ट रोजी जाहीर केले होते की त्यांना आपल्या दुसर्या मुलाची अपेक्षा आहे.
हेही वाचा -रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गोव्याला रवाना
सैफ अली खान आणि करिना यांना यापूर्वी तैमुर हा एक मुलगा आहे. सैफ आणि करिनाचे २०१२ मध्ये लग्न झाले झाले होते. २०१६ मध्ये तिने आपला पहिला मुलगा तैमुरला जन्म दिला होता.
हेही वाचा -मुंबई विमानळावर जुही चावलाचा 'झूमका गिरा'..!