ETV Bharat / sitara

विजय देवरकोंडाच्या 'डिअर कॉम्रेड'चाही येणार हिंदी रिमेक; करण जोहरची निर्मिती - rashmika

तेलंगाणातील विद्यार्थी राजकारणावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. तर, रश्मिका या चित्रपटात राज्यस्तरीय क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला होता.

'डिअर कॉम्रेड'चाही येणार हिंदी रिमेक
author img

By

Published : Jul 23, 2019, 9:11 PM IST

Updated : Jul 23, 2019, 9:26 PM IST

मुंबई - दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाची दाक्षिणात्य तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. काही दिवसांपूर्वीच विजयच्या 'अर्जुन रेड्डी' या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला 'कबीर सिंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यात शाहिद कपूरनं मुख्य भूमिका साकारली आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

यानंतर आता विजय देवरकोंडाच्या आणखी एका चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार आहे. करण जोहरनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विजय देवरकोंडासोबतचा आपला फोटो शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये करणने चित्रपटाच्या रिमेकबद्दलची घोषणा केली आहे. 'डिअर कॉम्रेड' चित्रपट पहिल्यांदाच पाहायला मिळणं माझ्यासाठी आनंदाचं होतं. ही एक सुंदर आणि प्रखर प्रेमकथा आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदना यांचे अभिनय अतिशय उत्तम आहेत, असं करणनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

यासोबतच चित्रपटात अनेक अनपेक्षित वळणे आहेत आणि हा सिनेमा शेवटी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आणि गरजेचा संदेश देतो, असं म्हणत करणने दिग्दर्शक भारत कम्मा यांचंही कौतुक केलं आहे. यासोबतच धर्मा प्रोडक्शन या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची निर्मिती करणार असल्याची घोषणा करताना अतिशय आनंद होत असल्याचे करणने म्हटलं आहे. करणने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत.

दाक्षिणात्य डिअर कॉम्रेड चित्रपट येत्या २६ जुलैला चित्रपटगृहात दाखल होत आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्ल्याळम अशा चार दाक्षिणात्य भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तेलंगणातील विद्यार्थी राजकारणावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार आहे तर रश्मिका या चित्रपटात राज्यस्तरीय क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला होता.

Intro:Body:

ent 

Conclusion:
Last Updated : Jul 23, 2019, 9:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.