मुंबई - निर्माता दिग्दर्शक करण जोहरने सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यात त्याची आई आणि दोन मुलांसह करण दिसत आहे. आज त्याच्या या जुळ्या मुलांचा वाढदिवस आहे.
करणचा मुलगा यश आणि मुलगी रुही यांचा आज तिसरा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याने फोटो शेअर करीत एक इमोशनल नोट लिहिली आहे. करणने लग्न केलेले नाही. तो सिंगल पेरंट आहे. सरोगसीच्या माध्यमातून तीन वर्षापूर्वी या जुळ्यांचा जन्म झाला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
करणने आपला पत्रामध्ये लिहिलंय, ''सामाजिकदृष्या मी एकटा पालक आहे...परंतु वास्तवात नेमके तसे नाही. माझी आई सुंदरपणे आणि भावनिकरित्या मुलांवर भरपूर प्रेम करते. मी तिच्या ठोस समर्थाशिवाय इतका मोठा निर्णय कधीच घेऊ शकलो नसतो. दोन्ही जुळे आता तीन वर्षांची झाली आहेत... आणि आमच्या धन्यतेची भावना प्रत्येक सरत्या वर्षातही नव्या जोमाने सुरू आहे. आम्हाला यश आणि रुही देऊन आम्हाला पूर्णत्व दिल्याबद्दल संपूर्ण विश्वाचा मी आभारी आहे.''
करणचे हे इमोशनल पत्र आणि त्याच्या मुलांचे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. आतापर्यंत ३ लाखाहून अधिक लोकांनी फोटोला लाईक केले आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटींनी मुलांना शुभेच्छा दिल्यात. यामध्ये काजोल, ट्विंकल खन्ना, भूमी पेडणेकर यासारख्या सेलेब्सचा समावेश आहे.