मुंबई - बॉलिवूडमध्ये आपली एक स्वतंत्र ओळख असलेला बहुगुणी दिग्दर्शक करण जोहर ५ वर्षानंतर दिग्दर्शनसाठी पुन्हा उतरणार आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या वतीने एक प्रेमकथा घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या नव्या चित्रपटाची घोषणा तो उद्या मंगळवार दिनांक ६ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता करणार आहे.
करण जोहरने नव्या चित्रपटाची घोषणा करीत असल्याचे सोशल मीडियावर कळवले आहे. त्याने एक व्हिडिओ जारी केला असून आपल्या आवडत्या दिग्दर्शनाच्या कामाकडे पुन्हा वळत असल्याचे सांगितले आहे. हा व्हिडिओ ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केला आहे.
त्यांनी लिहिलंय की, ''करण जोहर आपल्या नव्या सिनेमाची घोषणा उद्या ११ वाजता करणार आहे..५ वर्षानंतर दिग्दर्शक म्हणून परतत आहे.''
-
KARAN JOHAR TO ANNOUNCE NEW FILM TOMORROW AT 11 AM... RETURNS TO DIRECTION AFTER 5 YEARS... #KaranJohar #Announcement pic.twitter.com/Uw9tAFrsbT
— taran adarsh (@taran_adarsh) July 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">KARAN JOHAR TO ANNOUNCE NEW FILM TOMORROW AT 11 AM... RETURNS TO DIRECTION AFTER 5 YEARS... #KaranJohar #Announcement pic.twitter.com/Uw9tAFrsbT
— taran adarsh (@taran_adarsh) July 5, 2021KARAN JOHAR TO ANNOUNCE NEW FILM TOMORROW AT 11 AM... RETURNS TO DIRECTION AFTER 5 YEARS... #KaranJohar #Announcement pic.twitter.com/Uw9tAFrsbT
— taran adarsh (@taran_adarsh) July 5, 2021
करण जोहरची थोडक्यात ओळख
करण जोहर हा एक चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी काही दिग्दर्शित केल्याचे श्रेय त्याला दिले जाते. त्याला आजवर फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.
बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक करण जोहर
करणने आदित्य चोप्राच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटामध्ये शाहरूख खानच्या मित्राची भूमिका करून आपल्या बॉलिवूडमधील कारकिर्दीची सुरूवात केली. १९९८ साली त्याने 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर करणने शाहरूख खानसह अनेक चित्रपट काढले जे सर्व सुपरहिट झाले. करण जोहर, शाहरूख खान व काजोल यांचे त्रिकूट बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस मानले जाते. 'ऐ दिल है मुश्किल' हा त्याने ५ वर्षापूर्वी दिग्द्रशित केलेला शेवटचा चित्रपट होता.
टीव्हीवरही करणची लोकप्रियता
चित्रपतसृष्टीसोबतच करणने टेलीव्हिजनवरदेखील आपला ठसा उमटवला. त्याचा 'कॉफी विथ करण' हा मुलाखत कार्यक्रम लोकप्रिय होता. तसेच 'झलक दिखला जा' या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये तो माधुरी दीक्षित व रेमो डिसुझा यांच्यासोबत तो परिक्षक होता.
हेही वाचा - ‘भूत पोलिस’पोस्टर रिलीज, 'ओटीटी'वर रिलीजची झाली घोषणा!!