ETV Bharat / sitara

कपिल शर्माने तब्बल ६ महिन्यांनंतर केली 'ही' गोष्ट - the kapil sharma show

२०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात कपिलने गिन्नीसोबत लग्नगाठ बांधली. यानंतर आता कपिलने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्याने त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

कपिल शर्माने तब्बल ६ महिन्यांनंतर केली 'ही' गोष्ट
author img

By

Published : Jul 19, 2019, 11:04 PM IST

मुंबई - कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळख असणारा कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून सुनील ग्रोवरसोबतचा वाद आणि आपल्या विवाहामुळे चांगलाच चर्चेत राहिला. २०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात कपिलने गिन्नीसोबत लग्नगाठ बांधली. यानंतर आता कपिलने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्याने त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कपिलने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात कपिलचा क्लीन शेव लूक पाहायला मिळत आहे. या फोटोला कॅप्शन देत कपिलने म्हटलं आहे, की हास्य आपल्या जीवनात अधिक रंग भरतं, तब्बल सहा महिन्यांनंतर क्लीन शेव. कपिलच्या या फोटोला त्याच्या चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

दरम्यान कामाबद्दल बोलायचे झाल्यास, 'द कपिल शर्मा शो'मुळे कपिल सध्या चर्चेत आहे. याआधी त्याने 'फिरंगी' आणि 'किस किस को प्यार करू' सारख्या चित्रपटांतही भूमिका साकारल्या आहेत. मात्र, कॉमेडीचा बादशाह असणाऱ्या कपिलला चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकण्यास अपयश आलं.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.