मुंबई - 'बाहुबली' प्रभास आणि श्रद्धा कपूर त्यांच्या आगामी 'साहो' चित्रपटाचं दमदार प्रमोशन करत आहेत. छोट्या पडद्यावरील विविध कार्यक्रमांमध्ये ते हजेरी लावत आहेत. कॉमेडी किंग कपिलच्या 'द कपिल शर्मा शो'मध्येही प्रभास, श्रद्धा आणि नील नितीन मुकेश यांनी हजेरी लावली होती. यावेळी कपिल शर्माने त्यांच्यासोबत भरपूर धमाल केली.
प्रभासचे दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही प्रचंड फॅन फोलोअर्स आहेत. 'बाहुबली'च्या सीरिजनंतर तो ग्लोबल स्टार बनला आहे. आता 'साहो' चित्रपटाच्या निमित्ताने तो बॉलिवूडमध्येही एन्ट्री घेत आहे. २९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनेक अॅक्शन सिन्स, महागडे लोकेशन्स, ग्राफिक्स इफेक्ट्स, व्हिएफएक्स यावर प्रचंड खर्च करण्यात आला आहे. जेव्हा कपिलने त्याला चित्रपटाचं एकूण बजेट विचारलं तेव्हा प्रभासने दिलेल्या उत्तरानंतर कपिलची बोलती बंद झाली.
- View this post on Instagram
Stay tuned 😍 #saaho @actorprabhas @shraddhakapoor #thekapilsharmashow 📺 #tkss
">
'साहो'चं एकूण बजेट हे जवळपास ३५० कोटी इतके आहे. इतकंच काय, तर, या चित्रपटाच्या प्री रिलीज इव्हेंटवरही तब्बल अडीच कोटीचा खर्च करण्यात आला. त्यामुळे या चित्रपटाचं बजेट पाहून कपिलच नाही, तर, कार्यक्रमाची परीक्षक अर्चना पुरण सिंग या देखील हैराण झालेल्या पाहायला मिळतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
यावेळी कपिल मजेशीर अंदाजात म्हणतो, 'कोणीतरी मला चहा आणून द्याल का, माझे ब्लडप्रेशर कमी होत आहे'. त्याचा हा मजेशीर अंदाज पाहून प्रभासला हसू आवरत नाही. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.