भोपाळ - सातपुडाच्या सुंदर दऱ्याखोऱ्यात वसलेले विद्युत नगर सारनी आणि कोळसा नगरी पाथाखेडाचे सौंदर्य आगामी काळात चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कंगना रणौत आणि अर्जुन रामपाल यांच्या ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग येथे होणार आहे. हा परिसर मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात आहेत. चित्रपट युनिटच्या लोकांनी बैतूल जिल्हाधिकारी राकेश सिंह यांची भेट घेतली आणि चित्रपटाच्या शूटिंगच्या प्रस्तावित तयारीविषयी माहिती दिली.
शुटिंग झाल्यास सुंदर लोकेशन्स निर्मात्यांना समजतील
आवश्यक परवानग्या व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या शुटिंगमध्ये जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी टीमला दिली.
जिल्हाधिकारी राकेश सिंह म्हणाले की, जिल्ह्याचे सौंदर्य चित्रपटात दिसले तर इतरही निर्माते इथे शुटिंगसाठी येतील. तसेच याचा फायदा पर्यटनासाठीदेखील होऊ शकतो.
हेही पाहा - कोरोनामधून सावरला लुईस हॅमिल्टन, 'या' शर्यतीत घेणार सहभाग
सातपुड्यातील पर्यटनाला होऊ शकेल फायदा
फिल्म शूटिंग युनिटचे झुल्फिकार म्हणाले की, गुरुवारी त्यांची टीम जिल्हाधिकाऱ्यांना भेटली आणि चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित आवश्यक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चित्रपटाचे निर्माते सोहेल मलकाई आणि दीपक मुकुट, दिग्दर्शक रजनीश घई आहेत. या चित्रपटात कंगना रणौत, अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत आहेत.
हेही पाहा - विरूष्काच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण..विराटने केली खास पोस्ट