ETV Bharat / sitara

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मुंबईत पोहोचली कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौत रविवारी रात्री मुंबई विमानतळावर दाखल झाले. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ती मुंबई आपल्या घरी गेली. यावेळी विंमानतळावर असलेल्या मीडिया फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात कैद झाली. नवीन वर्षाचे स्वागत ती मुंबईत राहून करणार आहे.

author img

By

Published : Dec 28, 2020, 6:59 PM IST

Kangana Ranaut
कंगना रणौत

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत मुंबईत पोहोचली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ती दुसऱ्यांदा मुंबईत येत आहे. ती मनालीमधील आपल्या घरीच राहात होती. याच काळात १४ जूनला सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण घडले आणि मनालीतील आपल्या घरातून कंगना ट्विटरवरुन वादळ निर्माण करीत राहिली. याच्या परिणामी तिने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार यांच्याशीही पंगा घेतला होता.

मुंबईत पोहोचली कंगना रणौत

मुंबईला पीओके म्हणणे आणि उध्दव ठाकरेंना एकेरी बोलवणे तिला महागात पडले. तिच्यावर काही केसेसही दाखल झाल्या असून तिच्या कार्यालयावर बीएमसीचा हातोडा चालवण्यात आला होता. ती जेव्हा मनालीहून मुंबईत दाखल होणार होती तेव्हा केंद्र सरकारने तिच्यासाठी सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. त्याच दिवशी हा हातोडा चालवण्यात आला आणि बरेच दिवस ती चर्चेच्या केंद्र स्थानी राहिली. खरंतर न्यायालयाने बीएमसीला केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. कंगनाला नुकसान भरपाई देण्याचे आदेशही बीएमसीला देण्यात आले आहेत.

हेही वाचा -''ही ती कंगना नाही जीला मी ओळखतो'' - अनुराग बासू

मधल्या काळात ती शेतकरी आंदोलनावरही भाष्य केल्यामुळे चर्चेत होती. याकाळात तिचे आणि पंजाबी गायक अभिनेता दिलजीत दोसांझ यांच्या रंगलेले ट्विटर युध्द भरपूर चर्चेत आले होते. दरम्यान कंगना 'थलायवी'च्या शूटिंगसाठी चेन्नई आणि नंतर हैदराबादला जाऊन आली. आता ती 'धाकड' या सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात करणार आहे. आपले नवीन वर्ष ती मुंबईतच साजरे करणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा -सेटवर 'अदृष्य' वावरतात पंकत्र त्रिपाठी - किर्ती कुल्हारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.