ETV Bharat / sitara

कंगना प्रश्नावर भाजपची चुप्पी का? - नाना पटोले - Why BJP's silence on Kangana question?

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेले, तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसैनिक आणि संपूर्ण देशाचा अपमान कंगना रणौत करत आहे. कंगणाच्या वक्तव्यांना प्रसिद्धी देऊन माध्यमांनी तिला व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ नये अशी विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले
नाना पटोले
author img

By

Published : Nov 17, 2021, 10:26 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत (Actress Kangana Ranaut) आपल्या फाजील बडबडीने सध्या प्रकाश झोतात आली आहे. कंगना रणौत जाणून-बुजून अशा पद्धतीची वक्तव्य करून प्रसारमाध्यमांसाठी आकर्षण ठरत आहे. परंतु राष्ट्रपिता महात्मा गांधी (Father of the Nation Mahatma Gandhi)यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेले, तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसैनिक आणि संपूर्ण देशाचा अपमान कंगना रणौत करत आहे, असे सांगत, कंगणाच्या वक्तव्यांना प्रसिद्धी देऊन माध्यमांनी तिला व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ नये अशी विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole)यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

कंगना प्रश्नावर भाजपची चुप्पी का? (Why BJP's silence on Kangana question?)

कंगना वारंवार देश व देशातील महान नेत्यांबद्दल आक्षेपार्ह विधान करत आहे. विवादावर पडदा टाकण्याऐवजी कंगना एखाद नवीन विधान करून तो विवाद अजून भडकवत आहे. कंगनाच्या या प्रवृत्तीला भाजपच समर्थन असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. कंगनाने आता राष्ट्रपित्याचा ही अपमान केला आहे तरी भाजपने अजूनही याबाबत चुप्पी साधलेली आहे. भाजपने याबाबत आपले स्पष्टीकरण करावे, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्राला बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, प्र. के. अत्रे, गोपाळ गणेश आगरकर, गोविंद तळवळकर असे महान संपादक, पत्रकार लाभले, त्यांनी अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कडाडून प्रहार केला होता. आपण सर्वांनी याची आपण सर्वांनी याची आठवण ठेवून कंगनासारख्या समाजविघातक विखारी प्रवृत्तींना प्रसिद्धी देऊ नये असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांना केले आहे.

पत्रकार परिषदेला दिग्गज कॉंग्रेस नेत्यांची हजेरी

या पत्रकार परिषदेला आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव, प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे उपस्थित होते.

हेही वाचा - कॉमेडियन वीर दासच्या व्हिडिओने इंटरनेटवर वाद, दिल्ली मुंबईत तक्रारी दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.