मुंबई - कंगना रणौतची भूमिका असलेला अॅक्शन स्पाय थ्रिलर 'धाकड' हा चित्रपट 27 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल, दिव्या दत्त आणि सास्वता चॅटर्जी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दीपक मुकुट आणि सोहेल मकलाई निर्मित आणि हुनर मुकुट द्वारे सह-निर्मित, धाकड चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळममध्ये प्रदर्शित होणार आहे. कंगना रणौत म्हणाली की हा चित्रपट देशातील सर्वात मोठा "महिला अॅक्शन एंटरटेनर" असेल.
"या चित्रपटाची कथा महत्त्वाची आहे, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की 'धाकड' अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मी एजंट अग्निला भेटण्यासाठी आतुर झाली आहे."असे कंगनाने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कंगनाच्या म्हणण्यानुसार, तिची व्यक्तिरेखा सर्वांची मने खूश करणारी आहे. हा चित्रपट निर्मात्यांनी भव्य प्रमाणात बनवला आहे. आजवर भारतात इतका महिला अॅक्शन एंटरटेनर पाहायला मिलालेला नाही, असेही कंगना म्हणते.
रजनीश घई दिग्दर्शित 'धाकड' हा चित्रपट पूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये थिएटरमध्ये सुरू होणार होता. तथापि, कोविड-१९ महामारीमुळे चित्रपटाला विलंब झाला. 'धाकड' सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड द्वारे कमल मुकुट, सोहेल मकलाई प्रॉडक्शन आणि आश्रय चित्रपट यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केला जात आहे.
हेही वाचा - वयाच्या १८ व्या वर्षी ब्रेस्ट सर्जरी करण्याचा मिळाला होता सल्ला, दीपिका पदुकोणचा खुलासा