मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानावतचे म्हणणे असे आहे, की नागरिकता संशोधन कायद्याच्या मुद्द्यावरुन भारतासारख्या लोकशाही देशात हिंसाचार होणे चुकीचे आहे.
कंगनाने आंदोलनकर्त्यांवर आपला संताप व्यक्त करताना म्हटलंय, ''आपण नेहमीच शांततेने आंदोलनं केली पाहिजेत. आपला राग व्यक्त करण्यासाठी बसेस, रेल्वे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे योग्य नाही. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ३ ते ४ टक्के लोक टॅक्स भरतात. बाकीचे सगळे त्याच्या आधारेच वाढतात. मग याची भरपाई कोण करणार. देशात लोक उपाशी आहेत. अशावेळी हिंसा करणे मुर्खतेचे लक्षण आहे.''
मोदींचे नाव न घेता कौतुक करताना कंगना म्हणते, ''आपला देश पहिल्यापासूनच स्वतंत्र आहे. तर मग तुम्हाला कशापासून आझादी हवीय? इंग्रजांच्या काळात दंगे करणे, बंद करणे, सरकारी संपत्तीचे नुकसान करणे योग्य वाटत होते. मात्र आता सत्तेत असलेले लोक आपल्यातूनच गेले आहेत. हे इटली किंवा जपानमधून आलेले नाहीत. घोषणापत्रात लिहिलेले मुद्दे ते पूर्ण करीत आहेत त्यात चुकीचे काय आहे ? ही लोकशाही नाही काय ? याच्या विरोधात तुम्हा जात असाल तर स्वतः केलेल्या चुकांचे खापर दुसऱ्यावर फोडू नका.''
कंगना आगामी 'पंगा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अश्विन तिवारी यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यात कंगनासह जस्सी गिल, ऋचा चड्ढा आणि नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून लोकांना आवडत असल्याचे दिसत आहे.
'पंगा' चित्रपटानंतर कंगनाचा 'धाकड़' आणि 'थलाइवी' हे दोन चित्रपट प्रदर्शित होतील.