कंगना राणौतने (Kangana Ranau) अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील तिची काही छायाचित्रे पोस्ट करून एक लांबलचक नोट लिहिली आहे. यामध्ये तिने उघडपणे जीवे मारण्याच्या धमक्या (Kangana threatened to kill) येत असल्याचे सांगितले आहे. कंगनाने ही माहितीही दिली आहे की, तिला धमकी देणाऱ्यांविरोधात एफआयआर लिहिली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कंगनाने सोनिया गांधी यांना पत्र लिहून (Kangana wrote a letter to Sonia Gandhi )त्यांच्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना अशा लोकांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी केली आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावर कंगनाने एक पोस्ट केली होती. या पोस्टनंतरच आपल्याला धमक्या येत असल्याचं तिचं म्हणणं आहे.
मुंबई हल्ल्याची पोस्ट
कंगनाने लिहिले आहे की, मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांचे स्मरण करत मी लिहिले की, देशद्रोह्यांना कधीही माफ करू नका आणि त्यांना विसरू नका. या प्रकारात देशाच्या अंतर्गत गद्दारांचा हात आहे. कधी पैशाच्या लालसेने तर कधी पदाच्या लालसेपोटी भारतमातेला कलंकित करण्याची एकही संधी देशद्रोह्यांनी सोडली नाही आणि देशद्रोही षड्यंत्र रचून देशद्रोही शक्तींना मदत करत राहिले, तेव्हाच अशा घटना घडत आहेत.
हेही वाचा - 83 Trailer: विश्वचषकाचा पुन्हा प्रत्यय देणारा 83 चा ट्रेलर पाहून सेलेब्रिटीही झाले दंग