मुंबई - अभिनेत्री काजोलची मुख्य भूमिका असलेला 'देवी' हा लघुपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या लघुपटात काजोलसह नेहा धुपिया, नीना कुलकर्णी, श्रृती हासन, शिवानी रघुवंशी, संध्या म्हात्रे, रमा जोशी, मुक्ता बर्वे, यशस्विनी यांसारख्या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. मात्र, या लघुपटाची कथा कॉपी असल्याचा आरोप अभिषेक रायने केला आहे.
प्रियांका बॅनर्जी यांनी 'देवी' या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन केले आहे. तर, निरंजन अय्यंगर आणि रेयान इवान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मात्र, एका फेसबुक पोस्टद्वारे अभिषेक रायने म्हटले आहे, की '२०१८ साली आम्ही 'फोर' ही शॉर्टफिल्म तयार केली होती. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'देवी'ची कथा आमच्या शॉर्टफिल्मशी संबधीत आहे. आमच्या शॉर्टफिल्मचे प्रोडक्शन डिझाईन तसेच ऑडिओ हा कमी क्वालिटीचा होता. तरीही ही आमची कल्पना होती', असे अभिषेकने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
हेही वाचा -टॉलिवूड ते बॉलिवूड, 'या' रिक्रियेटेड भूमिकांनी गाजवलं बॉक्स ऑफिस
अभिषेकच्या या पोस्टवर 'देवी'च्या निर्मात्यांचे अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.