मुबंई - अभिनेत्री काजोल पती अजय देवगणला सेल्फी कसे घ्यायचे याचे धडे शिकवत आहे. काजोलने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती पायऱ्यावर बसलेली दिसत आहे. हा फोटो अजयने काढला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हा फोटो शेअर करीत काजोलने म्हटलंय,
''मी - बेबी चला एक सेल्फी घेऊयात.
पती - जा तिथे बस मी फोटो काढतो.
मी - सेल्फीचा अर्थ तुम्ही आणि मी एकत्र उभे राहायचे असते आणि आपल्या दोघांपैकी एकाने फोटो काढायचा असतो.''
अजयनेही फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'सेल्फीमधले माझे व्हर्जन साधारणपणे कॅमेऱ्याच्या मागे आहे.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अजय आणि काजोल सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना खूश ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतात.
त्यांच्या लग्नाला २१ वर्षे झाली आहेत. दोघांच्यातील नाते घट्ट असून दोघेही मजा मस्ती करण्यात गुंतलेले असतात.
अलिकडे दोघांनाही 'तान्हाजी' या चित्रपटात एकत्र पाहिले होते. या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.