मुंबई - अभिनेत्री काजल अग्रवाल लालबागच्या दर्शनाला पोहोचली होती. अत्यंत भक्तीभावाने तिने बाप्पाचे दर्शन घेतले. लालबागच्या राजाची मूर्ती डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न तिने यावेळी केला. सुंदर मूर्तीकडे पाहताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.
काजल ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. २०११ मध्ये आलेल्या अजय देवगणच्या 'सिंघम' चित्रपटामुळे तिची ओळख सबंध देशाला झाली. खरंतर ती २००४ पासून रुपेरी पडद्यावर काम करीत आहे. चिरंजीवचा मुलगा राम चरणचा पदार्पणाचा चित्रपट 'मगधीरा' २००९मध्ये झळकला होता. 'बाहुबली'चे दिग्दर्शक एस एस राजमौली यांनी काजोलची निवड या चित्रपटासाठी केली. हा चित्रपट साऊथमध्ये प्रचंड गाजला होता. यासाठी काजलला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.