ETV Bharat / sitara

VIDEO: खरंच ते निर्दोष होते का? जॉनने शेअर केला 'बाटला हाऊस'चा टीझर - बाटला हाऊस प्रकरण

१९ सप्टेंबरच्या दिवशी दिल्ली पोलीस आणि ४ दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, याविरोधात नंतर अनेकांनी आंदोलनं करत दिल्ली पोलिसांनी निर्दोष विद्यार्थ्यांना मारल्याचे म्हणत या घटनेचा तीव्र निषेध केला होता.

जॉनने शेअर केला 'बाटला हाऊस'चा टीझर
author img

By

Published : Jul 8, 2019, 4:50 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम लवकरच एका सत्य घटनेवर आधारित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बाटला हाऊस असं शीर्षक असलेला हा चित्रपट दिल्लीतील २००८ च्या ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारलेला असणार आहे. दरम्यान जॉनने आपल्या ट्विटरवरून या चित्रपटातील आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

१९ सप्टेंबरच्या दिवशी दिल्ली पोलीस आणि ४ दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, याविरोधात नंतर अनेकांनी आंदोलनं करत दिल्ली पोलिसांनी निर्दोष विद्यार्थ्यांना मारल्याचे म्हणत या घटनेचा तीव्र निषेध केला होता. हा राजकारणी आणि पोलिसांचा डाव असल्याचेही अनेकांनी म्हटले होते.

आम्ही नाही म्हणत, की ते विद्यार्थी नव्हते, मात्र खरंच ते निर्दोष होते का? असा सवाल जॉन या टीझरच्या शेवटी विचारत आहे. या रात्री नेमक काय झालं होतं? आणि यामागची सत्य कथा काय आहे? हे या चित्रपटातून सांगण्यात येत आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारणार आहे. या चकमकीत संजय कुमार यादव यांनी पोलीस पथकाचे नेतृत्त्व केले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.