मुंबई - अभिनेता जॉन अब्राहम अभिनयाबरोबरच खेळाची आवडही जपत असतो. तो सध्या लखनौमध्ये सत्यमेव जयते-२‘ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. जॉनचे मल्याळम कनेक्शन फेमस आहे कारण त्याचे वडील मल्याळी आहेत (ज्यांना कल्पना नसेल त्यांच्यासाठी - जॉनची आई पारशी आहे). केरळमध्ये फुटबॉल क्रिकेटपेक्षाही जास्त खेळाला जातो व पसंत केला जातो. ‘सत्यमेव जयते-२’ अजून एक अभिनेता आहे, राजीव पिल्लई. हे दोन्ही अभिनेते फुटबॉल-फॅन्स असून केरळच्या फुटबॉलचा प्रचार करणारा व त्या अनुषंगाने भारतीय फुटबॉलचा प्रसार करणारा आणि त्या खेळाला समर्थन देणारा एक व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला.
हेही वाचा - फॅशनिस्टा सई ताम्हणकरचे आकर्षक ‘सारी-लूक्स’!
अभिनेता राजीव पिल्लईची जॉन अब्राहमबरोबर काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राजीव नुकताच रिलीज होऊन गेलेल्या ‘शकीला’ मध्ये रिचा चड्ढा च्या प्रियकराच्या भूमिकेत दिसला होता. आता तो जॉन सोबत ‘सत्यमेव जयते-२’ चे शूटिंग करतोय व दोघांची ‘फुटबॉल’ वरून गट्टी जमलीय. फावल्या वेळात ते त्यांच्या आवडत्या खेळावर गप्पा मारत बसतात. खेळ ही अशी गोष्ट आहे की तो लोकांमधील दरी दूर करतो. काही दिवसांपूर्वी कधीही न भेटलेले जॉन आणि राजीव यांच्यातील खेळावरून अल्पावधीत झालेली मैत्री हेच प्रमाणित करते.
सध्या मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते-२’ चे चित्रीकरण वेगाने सुरू असून यात जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमारची जोडी रोमान्स करताना दिसेल. हा चित्रपट २०१८ साली आलेल्या सत्यमेव जयते चा सिक्वेल असून अन्यायाविरूद्ध लढा आणि सत्तेचा गैरवापर यावर आधारित आहे.
हेही वाचा - ‘पिंजरा’ ने गाठली शंभरी!