ETV Bharat / sitara

...अन्यथा सलमानचा जामीन फेटाळला जाईल, न्यायालयाचा इशारा - next hearing

पुढील तारखेला सलमान हजर राहिला नाही, तर त्याचा जामीन अर्ज फेटाळला जाईल. कारण, मागील सुनावणीवेळीही सलमानच्या वकिलांना त्याला न्यायालयात हजर करण्यास सांगितले गेले होते.

सलमान खान
author img

By

Published : Jul 4, 2019, 6:30 PM IST

मुंबई - काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले होते. यावेळी सलमानला ५ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा माफ व्हावी यासाठी सलमानने जोधपूर न्यायालयात निवेदन केले आहे. आजही या प्रकरणी असलेल्या सुनावणीसाठी सलमान न्यायालयात हजर न राहिल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

न्यायाधीश म्हणाले, पुढील तारखेला सलमान हजर राहिला नाही, तर त्याचा जामीन अर्ज फेटाळला जाईल. कारण, मागील सुनावणीवेळीही सलमानच्या वकिलांना त्याला न्यायालयात हजर करण्यास सांगितले गेले होते. त्यामुळे, याप्रकरणी न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त जामीन फेटाळण्याचा इशारा दिला आहे.

याप्रकरणी पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला होणार असून न्यायालयाने सलमानला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण -

ऑक्टोबर १९९८ मध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटींगवेळी जोधपूर जवळील गावात झालेल्या काळवीट हत्येप्रकरणी सलमान खान दोषी ठरला होता. जोधपूर न्यायालयाने त्याला ५ वर्षाची शिक्षा सुनावली होती. तर इतर ५ जणांना निर्दोष मुक्त केले होते. सलमान सध्या जामीनावर मुक्त आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.