ETV Bharat / sitara

फोटोग्राफर्सनी 'वहिनी' म्हणताच जेनेलियाच्या चेहऱ्यावर खुलले हसू, पाहा व्हिडिओ - genelia dsouza deshmukh news

अलिकडेच जेनेलिया आणि रितेशने 'कुली नंबर वन'च्या रॅपअप पार्टीमध्ये हजेरी लावली होती. तिथेही दोघांची केमेस्ट्री पाहायला मिळाली.

Riteish - Jenelia, Jenelia's Reaction on Photographers called her vahini, genelia dsouza deshmukh news, riteish deshmukh latest news
फोटोग्राफर्सनी 'वहिनी' म्हणताच जेनेलियाच्या चेहऱ्यावर खुलले हसू, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Mar 2, 2020, 9:07 AM IST

मुंबई - बॉलिवूडची क्युट जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा-देशमुख यांची बरीच लोकप्रियता पाहिली जाते. दोघांच्या फोटो आणि व्हिडिओंना चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रियाही मिळतात. त्यामुळे त्यांची झलक आपल्या कॅमेरात कैद करण्यासाठी फोटोग्राफर्सही धडपड करत असतात. अलिकडेच जेनेलिया आणि रितेशने 'कुली नंबर वन'च्या रॅपअप पार्टीमध्ये हजेरी लावली होती. तिथेही दोघांची केमेस्ट्री पाहायला मिळाली.

या पार्टीमध्ये जेनेलियाने आपल्या लुकने सर्वांवर छाप सोडली. तिच्यासोबत रितेशच्या आगळ्या वेगळ्या लुकने फोटोग्राफर्सचे लक्ष वेधले. त्याने आपल्या केसांना पांढरा रंग दिला होता. जेनेलिया मोनोक्रोम शॉर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या टीशर्टमध्ये खूपच क्यूट दिसत होती. फोटोग्राफर्सनी तिचे बरेच फोटो टीपले. यावेळी त्यांनी तिला 'वहिनी' अशी साद घातली. 'वहिनी' हा शब्द ऐकताच जेनेलियानेही गोड हसून दाद दिली.

हेही वाचा -दलजीत दोसांझच्या 'त्या' फोटोवर इवांका ट्रम्पची मजेशीर प्रतिक्रिया

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच तिच्या या व्हिडिओवर बऱ्याच प्रतिक्रिया देखील मिळाल्या आहेत.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, रितेश देशमुख लवकरच 'बागी ३' या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत दिसणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद नादियाडवाला यांनी केले आहे. तर, अहमद खान यांनी दिग्दर्शन केले आहे. ६ मार्चला हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे.

हेही वाचा -तृतीयपंथींयासाठी अक्षय कुमारचे मोठे पाऊल, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.