ETV Bharat / sitara

जावेद अख्तरांचा शेखर कपूरना टोला, "'मिस्टर इंडिया'ची आयडिया तुमची नव्हती" - Mr. India latest news

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी अलिकडेच मिस्टर इंडिया २ या चित्रपटाची घोषणा केली आहे. यामुळे मुळ मिस्टर इंडिया चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर नाराज झाले आहेत. या वादात उडी घेत जावेद अख्तर यांनी चित्रपटाची आयडिया शेखर यांची नव्हती असे म्हटलंय.

Javed Akhtar miffed with Shekhar Kapoor
जावेद अख्तरांचा शेखर कपूरना टोला
author img

By

Published : Feb 28, 2020, 8:58 PM IST

मुंबई - 'मिस्टर इंडिया २' चित्रपटाची घोषणा दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी केल्यानंतर चर्चेला उधाण आलंय. यामुळे अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर नाराज झालीय. अशातच मुळ चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी चित्रपटाचे क्रिएटिव्ह राईट्सबाबत नाराजी दाखवलीय. या वादात उडी घेत जावेद अख्तर यांनी चित्रपटाची आयडिया शेखर कपूर यांची नव्हती, असे म्हटलंय.

  • The argument on a remake of #MrIndia is not that no one took permission from me or even bothered to tell me.

    The question is. If you are remaking a feature film, based on a director’s very successful work, does the Director have no creative rights over what he/she created?

    — Shekhar Kapur (@shekharkapur) February 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'मिस्टर इंडिया २' चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर नाराजी व्यक्त करीत शेखर कपूर यांनी ट्विट करीत म्हटले होते, ''मिस्टर इंडियाचा रिमेक बनवताना कोणी माझी परवानगी घेतली नाही किंवा साधे कळवावे असेही वाटले नाही. प्रश्न हा आहे की तुम्ही जेव्हा एका दिग्दर्शकाच्या यशस्वी कलाकृतीचा रिमेक करणार आहात तर त्या दिग्दर्शकाकडे त्यानेच बनवलेल्या कलाकृतीचे हक्क नाहीत ?''

  • Shekhar saheb the story the situations the scenes the characters the dialogue the lyrics even the title none of these were yours .I gave it all to you . Yes you execute it very well but how can your claim on the film be more than mine . It wasn’t you idea . It wasn’t your dream

    — Javed Akhtar (@Javedakhtarjadu) February 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यावर जावेद अख्तर यांनी शेखर कपूरना ट्विट करीत उत्तर दिलंय. ते लिहितात, ''शेखर साहेब...कथा, वातावरण, व्यक्तीरेखा, संवाद, गीताचे बोल इतकेच काय तर शीर्षकही तुमचे नाही. हे सर्व मी तुम्हाला दिलं आणि हो, ते तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडलं. परंतु चित्रपटावर तुमचा दावा कसा होऊ शकतो. ही तुमची आयडिया नव्हती, हे तुमचे स्वप्न नव्हते.''

यापूर्वीही एका आघाडीच्या मीडियाशी बोलताना जावेद अख्तर यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते, ''मिस्टर इंडिया २ च्या निर्मात्यांनी बातचीत केली नसल्याबद्दल शेखर कपूर नाराज आहेत, परंतु शेखर कपूर यांच्याशी बातचीत करायची गरज काय ?''

''मिस्टर इंडिया २ चा निर्माता नैतिक आधारावर बातचीत करण्यासाठी बांधिल असू शकतो मात्र कायदेशीर पातळीवर त्याला कोणतेही बंधन नाही. दुसरे म्हणजे त्यांनी बाउंड स्क्रिप्टच्या शिवाय शूटींगला सुरूवात केली होती तेव्हा त्यांची क्रिएटीव्हिटी कुठे गेली होती ?''

''शेखर कपूरनी जेव्हा 'मिस्टर इंडिया' बनवली होती तेव्हा स्वतःच्या पध्दतीने काम केले होते आणि दुसरे लोक जेव्हा आपल्या पध्दतीने काम करतात तेव्हा त्यांना त्रास का होतोय?'', असेही जावेद म्हणाले होते.

'मिस्टर इंडिया' हा चित्रपट भारतातील पहिल्या सायन्स फिक्शनपैकी एक मानला जातो. यामध्ये अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी भूमिका केल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.