ETV Bharat / sitara

राजस्थानच्या वाळवंटात पोहोचली जॅकलिन फर्नांडिस! - जॅकलिन फर्नांडिसचे आगामी चित्रपट

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या एका पाठोपाठ एक चित्रपटांच्या सेट्स वर पोहोचतेय. तिच्या हातात चार-चार मोठे चित्रपट आहेत व काहींची बोलणी सुरु आहेत. आताच जॅकलिन फर्नांडिस राजस्थानच्या वाळवंटात पोहोचली, बच्चन पांडेच्या शूटसाठी.

Jacqueline Fernandes
जॅकलिन फर्नांडिस
author img

By

Published : Feb 17, 2021, 5:39 PM IST

Updated : Feb 17, 2021, 6:51 PM IST

मुंबई - हे वर्ष जॅकलिन फर्नांडिस साठी खूप बिझी असणार आहे असं दिसतंय. ती सध्या एका पाठोपाठ एक चित्रपटांच्या सेट्स वर पोहोचतेय. तिच्या हातात चार-चार मोठे चित्रपट आहेत व काहींची बोलणी सुरु आहेत. आताच जॅकलिन फर्नांडिज राजस्थानच्या वाळवंटात पोहोचली, बच्चन पांडेच्या शूटसाठी.

बच्चन पांडे चे बाकीचे कलाकार जैसलमेरमध्ये आधीच दाखल झाले होते व चित्रपटाचे चित्रीकरण जोरात सुरु आहे. आता जॅकलिन फर्नांडीज आपले शूट शेड्यूल सुरू करण्यासाठी राजस्थानमध्ये दाखल झाली आहे. या चित्रपटासाठीचे जॅकलिनचे हे पहिलेच शूटिंग-शेड्युल आहे आणि आता ‘बच्चन पांडे’ च्या चित्रीकरणाला अजूनही वेग येईल असे बोलले जातेय. सोशल मीडियावर जॅकलिन फर्नांडीज च्या ‘जेट-सेटिंग’ ची सुद्धा चर्चा आहे. जॅकलिन फर्नांडीज तिच्या टीमसह पहाटेच्या विमानात बसली आणि राजस्थानला पोहोचली. या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट टाकली आहे.

जॅकलिन फर्नांडिस
हाऊसफुल २ आणि ३ नंतर ही सतत हसमुख असणारी अभिनेत्री अक्षय कुमारसोबत पुन्हा एकदा स्क्रीन स्पेस सामायिक करणार आहे. एकामागून एक शूट करणारी जॅकलिन जानेवारी महिन्यात भूत पोलिस आणि सर्कसच्या सेटस वर होती.
जॅकलिन फर्नांडिस
जॅकलिन फर्नांडीज कडे असलेली चित्रपटांची मोठी रांग दर्शविते की ती इतर कोणाहीपेक्षा शर्यतीत मागे नाहीये. तिचे ‘बिग-तिकीट’ चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजित करण्यासाठी सज्ज होताहेत. रणवीर सिंगसह रोहित शेट्टी यांचे दिग्दर्शन असलेला सर्कस, सैफ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूर यांच्यासमवेत भूत पोलिस, सलमान खान बरोबर किक २ आणि आता शूट करत असलेला अक्षय कुमार सोबत चा बच्चन पांडे अशी तगडी चित्रपट-साखळी तिच्याकडे आहे. गोड आणि मादक जॅकलिन फर्नांडीस राजस्थानात आल्यामुळे वाळवंट अजूनही ‘तापणार’ तर नाहीना असं गमतीत बोललं जातंय.

हेही वाचा - लूप लपेटा’मध्ये रोमँटिक शैलीत तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन!

Last Updated : Feb 17, 2021, 6:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.