ETV Bharat / sitara

अभय देओलनेसोबत काम करणे खरेच खूप कठिण होते - अनुराग कश्यप - अभय देओल- अनुराग

अभिनेता अभय देओलनेसोबत काम करणे खरेच खूप कठिण होते. माझ्याकडे त्याच्यासोबत काम करण्याचा चांगला अनुभव नाही, असा खुलासा दिग्दर्शक अनुराग कश्यपने केला आहे. तो चांगला अभिनेता असल्याचेही तो म्हणाला.

Abhay Deol and Anurag Kashyap
अभय देओल- अनुराग
author img

By

Published : Jun 8, 2020, 8:13 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अभय देओलने इम्तियाज अलीच्या 'सोचा ना था' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर अनेक चित्रपटातून उत्तम अभिनय तो करताना दिसला. यामध्ये 'देव डी' आणि 'ओए लक्की लक्की ओए' या चित्रपटांचा समावेश होता.

'देव डी'मध्ये अभयने अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनाखाली काम केले. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. असं असलं तरी अनुराग कश्यपच्या मते अभय देओलबाबतचा अनुभव काही फारसा चांगला नव्हता. एका मुलाखतीत अनुराग यांने हा खुलासा केला आहे.

अनुराग म्हणतो, ''त्याच्यासोबत काम करणे खरेच खूप कठिण होते. माझ्याकडे त्याच्यासोबत काम करण्याचा चांगला अनुभव नाही. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर मी त्याच्याशी बातचीतही केली नाही.''

अनुरागचे म्हणणे आहे की, ''जेव्हा शूटिंग सुरू होते तेव्हा अक्षय खूप कन्फ्यूज होता. त्याला कलात्मक चित्रपट करायचे होते, परंतु मुख्य प्रवाहातील फायदेही त्याला पाहिजे होते. देओल असण्याचे बेनिफिट्स आणि लग्झरियसपणा त्याला हवा होता. चित्रपटाचे बजेट तंगीचे असल्यामुळे सर्वजण पहाडगंजमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते, परंतु तो फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला होता. त्याच्यासोबत काम करण्यासाठी अनेक दिग्दर्शकांनी टाळले त्याचे हेही एक कारण होते.''

अनुरागने सांगितले की, ''प्रमोशनमध्ये अभयची आवश्यकता होती तेव्हा तो गायब झाला होता.'' अनुराग म्हणतो, ''त्याने 'देव डी'चे प्रमोशन केले नाही. त्याने सिनेमा आणि क्रूचा अपमान केला. कारण तो भावनात्म आणि व्यक्तीगत पातळीवर लढत होता, याबद्दल त्याने कधीच सांगितले नाही, कदाचित यामुळे असेल. त्याला वाटत होते की, मी त्याला धोका दिलाय. मात्र त्याने याबाबत माझ्याशी कधीच बातचीत केली नाही.''

असे असले तरी, अनुराग कश्यपने अभय देओलला उत्कृष्ट अभिनेता असल्याचे म्हटले आहे. 'देव डी' टित्रपटात अभय देओल याच्या शिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी, माही गिल आणि कल्कि कोचलिन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट म्हणजे, २००९ मध्ये आलेल्या देवदास चित्रपटाचा हा आधुनिक अवतार होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.