मुंबई - बॉलिवूडचा तरूण स्टार ईशान खट्टर याने आपल्या सोशल मीडियावर आगामी ‘खाली पीली’ या चित्रपटाचा पहिला टेस्ट लूक शेअर केला. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक चित्र शेअर केले आहे, ज्यामध्ये तो टॅक्सी ड्रायव्हरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. दुसर्या फोटोमध्ये तो सिगारेट शिलगावताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या अभिनेत्याने असे म्हटले आहे की, "फस्र्ट लूक टेस्ट..ब्लैकी मॅन, किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. मकबूल खानने मला माझे आवडते एक पात्र दिल्याबद्दल त्याचे आभार. एक वर्षापासून खाली पीलीचे प्रॉडक्शन सुरू होते."
मकबूल खान दिग्दर्शित ‘खाली पीली’ चित्रपटामध्ये अनन्या पांडे ईशान खट्टरच्या सह-अभिनेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटात रोमँटिक अॅक्शन ड्रामा भरलेला आहे.