मुंबई - बॉलिवूडचे नवदांपत्य कॅटरिना कैफ आणि विकी कौशल लग्नानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. या जोडप्याने शनिवारी हळदी समारंभाचे सुंदर फोटो शेअर केले. कॅटरिना आणि विकी यांच्यातील प्रेम या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे. चाहते आणि बॉलिवूड स्टार्स या फोटोंवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आता विकी कौशलची मेहुणी इसाबेल कैफ हिनेही हळदी समारंभाचे खास फोटो शेअर करून आनंद वाढवला आहे.
कॅटरिना आणि विकीने शनिवारी सोशल मीडियावर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हळदी समारंभाचे अनेक फोटो टाकले, ज्यावर लाखो चाहत्यांनी आतापर्यंत लाईक बटण दाबले आहे. चाहत्यांव्यतिरिक्त अनेक बॉलिवूड स्टार्सनीही या जोडप्याच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, कॅटरिना कैफची धाकटी बहीण आणि विकी कौशलची मेव्हणी इसाबेल कैफनेही हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत इसाबेल जिजू विकी कौशलच्या गालावर हळद चोळताना दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोत कॅटरिना आणि विकी हळदीत माखलेले दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना विकी कौशलची मेव्हणी इसाबेल हिने लिहिले आहे, 'सगळी मस्ती आणि मजा, हसून माझे गाल अजूनही दुखत आहेत'.
कॅटरिना-विक्कीने ९ डिसेंबर रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे सात फेऱ्या घेऊन पार पडले. शुक्रवारी या जोडप्याने चॉपरने जयपूर विमानतळ गाठले. तिथून ते हनीमुनसाठी रवाना झाल्याची चर्चा आहे.
हेही वाचा - ह्रतिक रोशनचा वेलनेस कोच म्हणतो, "कंगना विनाशाच्या मार्गावर"