मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ एम.एस.धोनी फेम अभिनेत्री दिशा पटानीला डेट करत असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळतात. मात्र, या दोघांनीही आतापर्यंत आपल्या नात्याची कबुली दिली नाही. अशात नुकतंच टायगरनं या प्रश्नावर मजेशीर उत्तर दिलं आहे.
आज टायगरनं सोशल मीडियावर एक प्रश्न उत्तराचं सत्र ठेवलं. ज्यात चाहते त्याला त्याच्या फीटनेसविषयी आणि आवडत्या कलाकाराविषयी प्रश्न करताना दिसले. यावेळी एका चाहत्याने टायगरला सवाल केला, की तू दिशा पटानीला डेट करतोस का? चाहत्याच्या या प्रश्नावर टायगरनं अतिशय मजेशीर उत्तर दिलं.

तिला डेट करण्याची माझी लायकी नसल्याचं त्यानं आपल्या उत्तरात म्हटलं. एका चाहत्यानं विचारलं, तुला किती गर्लफ्रेंड आहेत? यावर उत्तर देताना टायगर म्हटला, नॉट इनअप. दरम्यान चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास टायगर लवकरच 'वॉर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात तो हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.