मुंबई - बॉलिवूड अभिनेता इरफान खान गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर होता. लंडनमध्ये तो कर्करोगावर उपचार घेत होता. आता या उपचारानंतर अखेर इरफान भारतात परतला आहे. नुकताच तो मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याने मीडियाचे कॅमेरे समोर येताच आपला चेहरा लपवला.
इरफानने आपल्या आगामी अंग्रेजी मीडियम सिनेमाचं चित्रीकरणही लंडनमध्येच केलं. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं. दिग्दर्शक होमी अदजानिया यांच्या दिग्दर्शनात बनलेला हा सिनेमा हिंदी मीडियम चित्रपटाचा सिक्वल आहे. इरफान लंडनमध्ये उपचार घेत असल्यानं या सिनेमाचं बहुतेक चित्रीकरण लंडनमध्येच करण्यात आलं.
दरम्यान इरफान लंडनमध्ये कर्करोगावर उपचार घेत असल्याने चित्रपटाचा बहुतेक भाग लंडनमध्येच शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री करिना कपूर पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर राधिका मदन, डिंपल कपाडिया, दीपक डोबरियाल आणि मनू ऋषी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून इरफान बऱ्याच दिवसांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.