मुंबई - पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ हा चित्रपट बेतला आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. या दोन्ही दिग्दर्शकांच्या इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या चित्रपटाविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आता त्याची ‘पिफ’ म्हणजे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.
गेली दोन वर्षं इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या चित्रपटाचं काम सुरू होतं. आता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाद्वारे पहिल्यांदाच दोन वर्षांची मेहनत पडद्यावर येणार असल्याचा आनंद आहे. अतिशय वेगळा आशयविषय असलेला हा चित्रपट हाताळणे काहीसे अवघड होते. मात्र ही कामगिरी आता पार पडली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानंतर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा मानस आहे, असे दिग्दर्शक प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी सांगितले.
इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी
इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीत चित्रपटात सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यांच्यासह दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, सुयश झुंजुरके आदींच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. सागर वंजारी यांनी संकलन, विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिग्दर्शन, गिरीश जांभळीकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. तब्बल २५०हून अधिक कलाकारांचा समावेश असलेला इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या चित्रपटाची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.
हेही वाचा - 'किंग ऑफ स्पिन'ला श्रध्दांजली : शेन वॉर्नच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोकलहर