मुंबई -अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अटक केली आहे. आर्यन खानला न्यायालयाने 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी खान कुटूंबियांकडून प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे यांची निवड करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी आर्यन खानच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणी पार पडली. सतीश मानेशिंदे आर्यनला जामीन मिळून देण्यात अपयशी ठरले. यामुळे आर्यनचा जामीनसाठी खान कुटूंबियांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. याशिवाय आर्यन खानची बाजू सत्र न्यायालयात सतीश मानेशिंदे मांडणार नसून त्यांच्या जागी अमित देसाई हे मांडणार आहेत.
कोन आहेत अमित देसाई..?
अमित देसाई हे एक क्रिमिनल लॉयर आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक बॉलीवूड अभिनेत्यांचे प्रकरण न्यायालयात लढले आहे. अमित देसाई यांनी सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खानला 2002 मध्ये हिट अँड रन प्रकरणात सुटका करून दिली होती. सोमवारी आर्यन खानचा जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेला होता. यावेळी न्यायालयात ड्रग्स प्रकरण अडकलेल्या
आर्यन खानची बाजू सतीश मानेशिंदे ऐवजी अॅड. अमित देसाई मांडणार असे न्यायालयात सांगण्यात आले. सोमवारी पहिल्याच दिवशी आर्यन खानचा जामीन अर्जावर एनसीबीकडून विरोध करण्यात आलेला होता. तसेच जामीन अर्ज दाखल करते वेळी आर्यन खानचे वकील अॅड. अमित देसाई आणि एनसीबीचे वकील अद्वैत सेठणा यांच्या जोरदार युक्तिवाद झालेला होता.
एनसीबीच्या वकिलांनी मागितला वेळ-
आर्यन खानचे वकील अॅड. अमित देसाई यांनी एनसीबीला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एनसीबीचे वकील अद्वैत सेठणा मुंबई सत्र न्यायालयाला एका आठवड्याची मुदत मागितली होती. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाने दोन दिवसांत एनसीबीने न्यायालयाला जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जामीन अर्जावरील सुनावणी १३ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे.
13 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी तहकूब -
२ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई ते गोवा जाणाऱ्या कार्डीला क्रूझवर ड्रग्स पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शनिवारी रात्री धाड टाकून बॉलिवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या सह आठ जणांना अटक केली. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर देण्यात आलेल्या एका दिवसाच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर आर्यन खानला ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयात तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने ७ ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना कोठडी सुनावली होती. त्यानंतर ८ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने १४ दिवसांची कोठडी आरोपींना सुनावली. यानंतर आज आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेला यांच्या वकिलांनी आज जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात दाखल केला होता. यावेळी एनसीबीच्या वकिलांनी मात्र, जामीन अर्जावर रितीसर उत्तर देण्यासाठी एनसीबीने वेळ मागितल्याने आजची सुनावणी सत्र न्यायालयाने तहकुब केली आहे. आता बुधावरीपर्यंत एनसीबीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला आहे.
हेही वाचा - कार्तिक आर्यनचा अजून एक ‘धमाका’, रोमँटिक थ्रिलर 'फ्रेडी' साठी वाढवले १४ किलो वजन!