ETV Bharat / sitara

inside story of Madipa's revenge : '83' विश्वचषकात कपिल देव आणि मदनलालने असा घेतला रिचर्ड्सचा बदला - 83's new teaser

१९८३ विश्वचषक स्पर्धेदरम्यान अनेक किस्से घडले त्यातील काही प्रमुख 83 या चित्रपटात अंतर्भूत करण्यात आले असून कपिल देव आणि मदनलाल यांनी वेस्ट इंडिजचा तडाखेबाज बल्लेबाज रिचर्ड्सचा बदला कसा घेतला हे ऐकणे आणि बघणे मजेशीर आहे. तो किस्सा ‘83’ च्या पडद्यावर रणवीर सिंग आणि हार्डी संधू यांनी जिवंत केला आहे. एका समारंभात खुद्द कपिल देव यांनी मदन लाल यांच्या रिव्हेंजची कहाणी शेअर केली असून रणवीर सिंग आणि हार्डी संधू यांनी हा चिन्हांकित सीन कसा रिक्रिएट केला ते बघायला प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल.

क्रिकेट विश्वचषक 83 ची कथा
क्रिकेट विश्वचषक 83 ची कथा
author img

By

Published : Dec 14, 2021, 3:53 PM IST

१९८३ साली संपूर्ण क्रिकेट जगताने भारतीय संघाला हलक्यात घेतले होते. परंतु स्वतःवर विश्वास असणारी टीम आणि कपिल देवचे तडफदार नेतृत्व याने क्रिकेट विश्वचषक भारतात आला. त्याचीच गाथा ‘83’ या चित्रपटातून दर्शविण्यात आली आहे. या स्पर्धेदरम्यान अनेक किस्से घडले त्यातील काही प्रमुख 83 या चित्रपटात अंतर्भूत करण्यात आले असून कपिल देव आणि मदनलाल यांनी वेस्ट इंडिजचा तडाखेबाज बल्लेबाज रिचर्ड्सचा बदला कसा घेतला हे ऐकणे आणि बघणे मजेशीर आहे. तो किस्सा ‘83’ च्या पडद्यावर रणवीर सिंग आणि हार्डी संधू यांनी जिवंत केला आहे. एका समारंभात खुद्द कपिल देव यांनी मदन लाल यांच्या रिव्हेंजची कहाणी शेअर केली असून रणवीर सिंग आणि हार्डी संधू यांनी हा चिन्हांकित सीन कसा रिक्रिएट केला ते बघायला प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल.

'83' हा चित्रपट रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले असून संपूर्ण देश या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट १९८३ च्या क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या विजयावर आधारित आहे. रणवीर सिंग कर्णधार कपिल देवची भूमिका साकारत आहे, तर हार्डी संधू गोलंदाज मदन लालच्या भूमिकेत दिसणार आहे जिथे ते १९८३ च्या क्रिकेट विश्वचषकात भारताचा विजयाला रीक्रिएट करतील. चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिडीओमध्ये कपिल देव यांनी मदन लाल यांच्या बदल्याविषयीचा खुलासा केला. मदन लाल हे १९८३ च्या विश्वचषकातील सर्वात प्रभावी गोलंदाज होते.

रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत असून ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटिल, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी यांच्यादेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. दीपिका पादुकोण या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारत आहे.

‘83’ या चित्रपटाची निर्मिती दीपिका पादुकोण, कबीर खान, विष्णु वर्धन इंदुरी, साजिद नाडियाडवाला, फैंटम फिल्म्स, रिलायंस एंटरटेनमेंट यांनी मिळून केली आहे. रिलायंस एंटरटेनमेंट आणि फँटम फिल्म्स यांच्याद्वारे कबीर खान फिल्म्स प्रॉडक्शनच्या ‘83’ ला प्रस्तुत करण्यात आले आहे. रिलायंस एंटरटेनमेंट आणि पीवीआर पिक्चर्सचा हा चित्रपट २४ डिसेंबर २०२१ ला हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड़ आणि मलयाळम मध्ये 2D आणि 3D मध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा - Harnaaz Sandhu चे नजर खिळवून ठेवणारे फोटो, एकदा बघाच..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.