मुंबई - चित्रपट निर्माते शकुन बत्राचा पुढचा चित्रपट एका रंजक विषयावरील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. अद्याप अशीर्ष ठरले नसलेल्या या चित्रपटात दीपिका पादुकोण फिटनेस ट्रेनर म्हणून काम करणार आहे. यात ती धैर्य करवाने साकारलेल्या व्यक्तिरेखेशी विवाहबाह्य संबंध ठेवताना दिसेल.
शकुनचा आगामी चित्रपट अशा चित्रपटांपैकी एक आहे, ज्यात नवे जुने असे सर्व थरातील कलाकार एकत्र काम करतान दिसतील. एका मुलाखतीत बोलताना दीपिका म्हणाली, की हा एक कौटुंबिक विषय असला तरी भारतीय प्रेक्षकांना हा विषय फारसा परिचित नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
निर्मात्यांनी चित्रपटाविषयीची माहिती गुलदस्त्यात ठेवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दीपिका आणि धैर्य यांच्या या सिनेमातील व्यक्तीरेखा अवैध संबंध ठेवलेले असतील आणि दोघांच्यामध्ये काही इंटिमिटे सीन्सही असतील. धैर्यने '८३' या चित्रपटात दीपिकासोबत काम केले आहे. त्याने या सिनेमात रवी शास्त्रीची भूमिका केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
धैर्यची निवड करण्यापूर्वी निर्मात्यांच्या डोक्यात या भूमिकेसाठी इशान खट्टर होता. मात्र दीपिकाच्या तुलनेत तो फारच लहान वाटू शकतो त्यामुळे त्याला बदलण्यात आले. धैर्य हा करण जौहरची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी धर्म कॉर्नरस्टोन एजन्सी (डीसीए) चा भाग असल्यामुळे त्याची निवड सोपी झाली.
हेही वाचा - मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी झाली होती कोरोनाबाधा - अॅडलिन कॅस्टेलिनो