ETV Bharat / sitara

‘सुपर ३०’चे रिअल हिरो आनंद कुमारांना ब्रेन ट्युमर, स्वतःचा बायोपिक पाहण्याची इच्छा - brain tumour

आनंद कुमार म्हणाले, २०१४ मध्ये माझी अवस्था अशी झाली होती, की मी माझ्या उजव्या कानाने ऐकू शकत नव्हतो. यासाठी मी पटनामध्ये अनेक उपचार घेतले आणि काही तपासणींनंतर हे समोर आलं, की माझ्या उजव्या कानाची श्रवणक्षमता ८० ते ९० टक्क्यांनी कमी झाली आहे.

‘सुपर ३०’चे रिअल हिरो आनंद कुमारांना ब्रेन ट्युमर
author img

By

Published : Jul 10, 2019, 10:01 PM IST

मुंबई - हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला सुपर ३० चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. दरम्यान नुकतंच आनंद कुमार यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

आनंद कुमार यांना ब्रेन ट्यूमर आहे. मरणाआधी स्वतःचा बायोपिक पाहाण्याची आपली इच्छा होती, असं त्यांनी नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. स्वतःचे काम आणि प्रवास जिवंत असेपर्यंत पाहायचा होता. मी कधीपर्यंत जगेल याबद्दल काहीही माहिती नसल्यानं चित्रपटाच्या लेखकानंही जितकं शक्य होईल तितक्या लवकर चित्रपटाची कथा लिहिली, असं आनंद कुमार यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले, की २०१४ मध्ये माझी अवस्था अशी झाली होती, की मी माझ्या उजव्या कानाने ऐकू शकत नव्हतो. यासाठी मी पटनामध्ये अनेक उपचार घेतले आणि काही तपासणींनंतर हे समोर आलं, की माझ्या उजव्या कानाची श्रवणक्षमता ८० ते ९० टक्क्यांनी कमी झाली आहे. नंतर दिल्लीच्या एका रूग्णालयात अनेक तपासण्या केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी सांगितले, की कानाची नस मेंदूपर्यंत जिथे जाते तिथे ट्युमर आहे, सध्या यासाठी मी मुंबईच्या हिदूंजा रूग्णालयात उपचार घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आनंद कुमार यांनी यावेळी हृतिकचंही कौतुक केलं. या चित्रपटाला हृतिकशिवाय दुसरं कोणीही न्याय देऊ शकलं नसतं. तो एक उत्तम अभिनेता आहे आणि सध्या माझं त्याच्यासोबत रोज बोलणं होतं. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत माझा जीवनप्रवास बरोबर मांडला जावा यासाठी चित्रपटाची स्क्रीप्ट मी १३ वेळा वाचली आणि ती अगदी बरोबर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.