मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूरने गुरुवारी आपल्या दिवंगत आई आणि दिग्गज स्टार श्रीदेवीसह स्वत: चा एक अनमोल थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. श्रीदेवीच्या 57 व्या जयंतीनिमित्त, जान्हवी कपूरने इंस्टाग्रामवर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या आईला मिठी मारताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
"आय लव यू मम्मा," असे या फोटोला जान्हवीने कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टनंतर चाहते आणि सहानुभुतीदारांनी भरपूर ह्रदयस्पर्शी प्रतिक्रिया दिल्या आहेत. श्रीदेवीने 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत अखेरचा श्वास घेतला,
हेही वाचा - करिना कपूर दुसऱ्यांदा आई होणार असल्यामुळे सोहा अलीने केले अभिनंदन
१९६३ मध्ये श्री अम्मा याँगर अय्यपान या नावाने जन्मलेल्या श्रीदेवीने चांदनी, लम्हे, मिस्टर इंडिया, चालबाज, नगीना, सदमा आणि इंग्लिश विंग्लिश अशा हिंदी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.
पद्मश्री पुरस्काराने नावाजलेल्या श्रीदेवीने तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही तिच्या अभिनयाने उत्कृष्ट कामगिरी केली. तिचा शेवटचा चित्रपट मॉम होता, ज्यासाठी तिला मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.