मुंबई - ट्रोलर्सकडे मी दुर्लक्ष करतो, असे मत कॉमेडियन कपिल शर्मा यांन बोलून दाखवलंय. विनोदाच्या माध्यमातून जगात एक चांगले स्थान निर्माण करण्यावर विश्वास असल्याचेही तो म्हणाला.
कपिल शर्माने त्याच्या कॉमेडी शोमध्ये सुशांत सिंहबद्दल काहीच मत व्यक्त न केल्याबद्दल ट्रोलर्सनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती. ट्रोलिंगचा सामना तो कसा करतो, असे विचारले असता कपिल म्हणाला, मी फक्त माझ्या चाहत्यांना हसवण्यावर लक्ष केंद्रीत करतो. विनोदाच्या माध्यमातून जगात चांगले स्थान निर्माण करण्यावर विश्वास ठेवतो. मी ट्रोल्सवर जास्त लक्ष देत नाही.
कपिल सध्या आयुष्याचा आनंद घेत आहे. गेल्या वर्षी, तो वडील बनला होता आणि आता तो मुलांसाठी बनणाऱ्या एका शोचा भाग बनला आहे.
कपिल म्हणतो, "मी स्वत: ला खूप धन्य समजतो. दररोज कुठलीतरी नवीन ऑफर येत आहे. वडील होण्यापूर्वीच मला मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. यामुळेच 'द कपिल शर्मा शो'मध्ये आता तुम्हाला मुलांचा अवतार पहायला मिळणार आहे. मुलांसाठी मी अजून बरेच काही करत राहीन. 'हनी बनी शो विथ कपिल शर्मा' चांगली सुरुवात आहे. "
शोबद्दल बोलताना कपिल म्हणाला, "मी पहिल्यांदा अॅनिमेटेड शोचे शूटिंग करीत आहे. हा एक नवीन अनुभव आहे, आता मी त्याचा आनंद घेत आहे. हा एक अनोखा आणि रोमांचक अनुभव आहे."