मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने आपल्या टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोला पाहून चाहते भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.
या फोटोत त्याचा स्टाइलिस्ट, जिम कोच, मेकअप आर्टिस्ट आणि पर्सनल बॉडीगार्ड यांचा समावेश आहे. सर्वांसोबत त्याने एक स्टायलिस्ट फोटो शेअर केलाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, "या दिग्गजांच्या खांद्यावर मी उभा आहे. प्रत्येक सुपरस्टारला धन्यवाद. आतापर्यंतची बेस्ट टीम."
या वर्षी त्याला बॉलिवूड पदार्पण करून २० वर्षे पूर्ण झाली आहेत. २०१९ हे वर्ष त्याच्यासाठी संपले होते. 'सुपर 30' आणि 'वॉर' हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवून गेले.