ETV Bharat / sitara

ह्रतिक रोशनच्या आईने शेअर केले ब्रेन सर्जरीचे फोटो, लिहिली भावूक पोस्ट - Hrithik Roshan latest news

ह्रतिकची ब्रेन सर्जरी काही वर्षापूर्वी झाली होती. 'बँग बँग' चित्रपटाच्या शूटींगच्यावेळी त्याच्या डोक्याला इजा झाली होती. त्यावेळचा फोटो त्याची आई पिंकी रोशन यांनी शेअर करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

Hrithik's mother Pinkie pens heartfelt post
ह्रतिक रोशनच्या आईने शेअर केले ब्रेन सर्जरीचे फोटो
author img

By

Published : Jan 11, 2020, 5:05 PM IST

मुंबई - ह्रतिक रोशन खऱ्या आयुष्यातही हिरो आहे. त्याच्या १० जानेवारीला पार पडलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची आई पिंकी रोशन यांनी एक भावूक पोस्ट लिहित ब्रेन सर्जरीच्यावेळचे फोटोही शेअर केले आहेत.

फोटो ब्रेन सर्जरीच्या वेळचे आहेत. यात ह्रतिक रोशन ऑपरेशन टेबलवर झोपलेला दिसत असून चेहऱ्यावर हास्य आहे. बाजूला उभे असलेले डॉक्टर व्हिक्टरीचे साईन दाखवताना दिसतात. हा ऑपरेशननंतर रिकव्हरीच्यावेळचा फोटो आहे. या फोटोसह एक पत्र लिहित पिंकी यांनी आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.

जड अंतःकरणाने हे फोटो शेअर करत असल्याचे पिंकी रोशन यांनी म्हटलंय. जड अंतःकरणाने यासाठी की, याचं वाईट वाटते म्हणून नव्हे, तर फोटोच्या प्रेमात बुडाल्यामुळे आहे. डुग्गु जेव्हा सर्जरीसाठी जात होता तेव्हा तो बेशुूद्ध होणार होता. डॉक्टरांच्या हातात त्याला पाहून वाटले की एक नवजात आहे. कारण तो जन्मला होता तसाच सुंदर डोळ्यांनी पाहात होता. परंतु त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, दडपण नव्हते, असे कोणतेही आव्हान नाही की जे त्याने पेलले नाही किंवा सफल झाला नाही.

या फोटोला ह्रतिकचा वॉर चित्रपटातील सहकलाकार टायगर श्रॉफने कॉमेंट केली आहे. त्याने लिहिलंय, ''सर्वात मजबूत सुपरहिरो माझी प्रेरणा आहे. पिंकी आंटी फोटो शेअर केल्याबद्दल आभार.'

ह्रतिकची ब्रेन सर्जरी काही वर्षापूर्वी झाली होती. 'बँग बँग' चित्रपटाच्या शूटींगच्यावेळी त्याच्या डोक्याला इजा झाली होती.

Intro:Body:

ent news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.