ETV Bharat / sitara

ह्रतिक रोशनने सुरू केली 'फायटर'ची तयारी - हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण पहिल्यांदाच 'फायटर' या अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटासाठी त्याचा लूक सडपातळ असणार आहे.

Hrithik Roshan
ह्रतिक रोशन
author img

By

Published : Mar 5, 2021, 8:00 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन आता सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आगामी 'फायटर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याचा लूक कसा असेल याचे नियोजन त्याने केले आहे.

रिपोर्ट्सनुसार 'फायटर' चित्रपटात हृतिकचा दुबळा अवतार असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या चित्रपटातील लूकसाठी मोठी तयारी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ह्रतिक रोशनला यासाठी फार वेगळे काही करावे लागणार नाही. सडपातळ शरीर होण्यासाठी तो फिटनेसची तयारी करीत आहे. अहवालानुसार तो आहारावर नियंत्रण ठेवत असून दररोज ३००० कॅलरीज बर्न करीत आहे.

जानेवारीत हृतिकने ४७ व्या वाढदिवशी 'फायटर'ची घोषणा केली तेव्हा तो म्हणाला की, आनंदबरोबर त्याचे नाते आणखी दृढ झाल्यामुळे हा एक खास चित्रपट आहे. ह्रतिकने सिद्धार्थ आनंद यांच्या दोन चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

दीपिका पादुकोणची मुख्य भूमिका असणारा 'फायटर' ३० सप्टेंबर, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - LIVE : अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाचा मृतदेह सापडला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.