ETV Bharat / sitara

'क्रिश ४' मध्ये अवतरणार निळ्या डोळ्यांचा 'जादू', ह्रतिकने दिले संकेत - निळ्या डोळ्यांचा एलियन जादू

बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या 'क्रिश' फ्रांचाईसचा चौथा भाग 'क्रिश ४' पडद्यावर झळकणार आहे. यात १६ वर्षानंतर पुन्हा निळ्या डोळ्यांचा एलियन जादू अवतरणार आहे. या जादूची प्रतीक्षा प्रेक्षकांनाही आहे. त्यामुळे ह्रतिकच्या या नव्या चित्रपटाची जोरदार प्रतीक्षा होणार आहे.

Hrithik Roshan
सुपरहिरो ह्रतिक रोशन
author img

By

Published : May 22, 2020, 3:23 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा सुपरहिरो ह्रतिक रोशन पुन्हा एकदा निळ्या डोळ्यांच्या परग्रहावरुन आलेल्या जादूसोबत झळकणार आहे. 'क्रिश ४' या चित्रपटात ह्रतिक आणि जादूची जोडी पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. क्रिशच्या यशस्वी फ्रांचाईसपैकी एक असलेला हा आगामी चित्रपट भरपूर नाट्यमय आणि मनोरंजक असेल.

या चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी संबंधित व्यक्तीने सांगितले, ''क्रिशची कथा पुढे कशी घेऊन जायची याबाबत राकेशजी, ह्रतिक यांनी लेखकांच्या टीमसोबत चर्चा केली आणि अखेर त्यांनी एका गोष्टीवर एकमत करीत पक्के केले. लोकांच्या स्मरणात असेला जादू परत आला तर तो प्रेक्षकांना आवडणारा आहे. 'क्रिश ३' मध्ये रोहित मेहरा मरण पावला. आता क्रिशला स्पेशल पॉवर देणाऱ्या एलियनची ओळख होणे आवश्यक आहे.''

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ह्रतिक रोशन आणि राकेश रोशन या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर भरपूर मेहनत घेत आहेत. याचे शूटिंग लवकरात लवकर सुरू करण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्यांनी चित्रपटाची भव्यता, तांत्रिक बाबी, दृष्ये यासाठी तज्ञांशी बोलायला सुरुवात केली आहे.

ह्रतिकने काही दिवसापूर्वी एक गुढ विधान केले होते. त्यामध्ये तो १६ वर्षानंतर जादू पृथ्वीवर परत येणार असल्याचे म्हणाला होता.

राकेश रोशन यांच्या आजारपणामुळे या चित्रपटाचे काम लांबणीवर पडले होते. ह्रतिक रोशनसाठी हा चित्रपट खूप महत्त्वकांक्षी आहे.

'क्रिश ३' या चित्रपटाला जगभर उत्तम प्रतिसाद मिळाला होता. २९० कोटी रुपयांची कमाई या सिनेमाने केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.