ETV Bharat / sitara

ऋषिकेश मुखर्जी, बासु चटर्जी यांच्या हास्य चित्रपटाच्या पंक्तीतील ‘सूरज पे मंगल भारी’ - दिलजीत दोसंज

‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणारा आहे. नव्वदच्या दशकातील एक मिश्कील विनोदी असा हा चित्रपट असेल. हृषिकेश मुखर्जी आणि बासु चटर्जी यांच्या हास्य चित्रपटांच्या श्रेणीमधील हा एक स्वच्छ विनोदी चित्रपट आहे, असे दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांना वाटते.

'Suraj Pe Mangal Bhari
‘सूरज पे मंगल भारी’
author img

By

Published : Oct 21, 2020, 7:23 PM IST

मुंबई - चित्रपट निर्माता अभिषेक शर्मा आपल्या नवीन ‘सूरज पे मंगल भारी’ या कॉमेडी चित्रपटातून कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. त्याची ही कहाणी नव्वदच्या दशकाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. हृषीकेश मुखर्जी आणि बासु चटर्जी यांच्या हास्य चित्रपटांच्या श्रेणीमधील हा एक स्वच्छ विनोदी चित्रपट आहे, असे अभिषेक शर्मा यांना वाटते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

मनोज बाजपेयी, दिलजीत दोसंज आणि फातिमा सना शेख अभिनीत या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्यात नॉन स्टॉप कॉमेडीची चौफेर उधळण दिसली होती. हा चित्रपट लग्नाच्या निमित्ताने झालेल्या हेरगिरीचा आहे.

शर्मा यांनी सांगितले की, "हा चित्रपट भूतकाळातील साधेपणाचा विचार लक्षात ठेवून करण्यात आलाय. याच्या कथेत एक साधेपणा आहे. हा साधेपणा आपल्याला हृषिकेश मुखर्जी आणि बासु चटर्जी यांच्या चित्रपटांची आठवण करुन देणारा आहे. हा एक सुबक कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. "

हा चित्रपट दिवाळी निमित्त प्रदर्शित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.